पान:दूध व दुभते.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंडळींच्या निष्काळजीपणास सुरुवात होते. पैकी मुख्य बाबी म्हटल्या म्हणजे (१) दधाचे भांडे केव्हाही तयार नसणे, घरांत गवळी आला म्हणजे दुधाचे भांडे शोधावे लागते व ते बहुतेक खरकटया भांडयांत असते, अगर घांसलें जात असते. पुढे ते कसेतरी गडबडीने विसळतात व अशा त्या भांड्यास वाईट घाण येतच असते. पुढे ते भांडे कोरडे करण्याचा प्रयोग होतो. द्धाचे भांडे पुसण्याकरितां स्वच्छ निराळा कपडा केव्हाही असावयाचा नाही. जर असलाच तर तो वेळेवर कधीं सांपडावयाचा नाही. मग ते भांडे ओंच्यासच पुसले जातें, अगर लोळत पडलेल्या एखाद्या फडक्याने पुसले जातें. (२) दूध पातेल्यात आल्यावर सवडीनुसार लवकर किंवा उशीरां दूध गाळण्याचा समारंभ होतो. हे गाळण्याचे फडके म्हणजे सर्वकामोपयोगींच असते. चहा, कॉफी गाळणे, कढवलेले तूप गाळणे व अडत्या नडत्या वेळी स्वयंपाकांत हाती धरण्यास त्याचा उपयोग करणे, वगैरे गोष्टी एकाच कपड्याने प्रसंगानसार होत असतात. असें गाळणे बहुतेक अंधाऱ्या जागेत वाळत असा. वयाचें म्हणून त्यावर धुंगुरटी, चिलटें, वगैरे मंडळी दबा धरून बसलेली असते. अर्थातच त्यांचे सर्व विधि त्या गाळण्यावरच होतात. अशा गाळण्याने मोठामोठा कचरा गाळण्यावर राहून स्वतः गाळण्यांतील अदृश्य गाळीव मळ दुधांत जातो. (३) लेकुरवाळ्या आईच्या लेकरांनी भुकेसाठी गोंधळ केलेला असावयाचा व त्यांतल्यात्यांत इतर कामांची धांदल, यामुळे रडत्या मलांच्या पोटांत ते वरील दूध तापविल्याशिवायच जात असते. (४) अशा वेळी पूजा आटोपून नैवेद्याची वेळ आलेली असावयाची. तेव्हां आयत्यावेळी दुधाचे पातेले उचलून त्यांतून नैवेद्याचे दूध दुस-या भाज्यांत ओतण्याची तसदी न घेतां में वेळेवर हातास येईल, तें लहान मोठे भांडें दुधांतच बुचकळून नैवेद्य देणे, वगैरे एक ना दोन अशा कित्येक बाबीमुळे दुधासंबंधी निष्काळजीपणा होत असतो व त्यामुळे त्याचा वाईट परिणाम तें दूध वापरणारावर होतो. यावरून सर्वत्र ठिकाणी अशा गोष्टी घडतात असे मुळीच म्हणणे नाही, तर उलटपक्षी कित्येक ठिकाणी दूधदुभत्याविषयी अगदी अनुकरणीय स्वच्छता असते. . वर दिलेल्या गोष्टी कोणीही समजून उमजून करीत नाही. अशा रीतीने दूध बिघडते हे त्यांच्या लक्षांतच मुळी येत नाही. यांचे मुख्य कारण म्हणजे दुधाच्या गुणधर्माविषयींचे त्याचे अज्ञान हेच आहे. हे अज्ञान अंशतः तरी