पान:दूध व दुभते.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रें. ] परिशिष्ट. केंद्रोत्सारिणी शक्ती-'Centrifugal force' आपण एकाद्या दोरीस एक दगड बांधला आणि दुसरे टोंक धरून ती दोरी गरगर फिरविली, तर तो दगड बाहेर फेकला जात आहे असे वाटते, व हातास मोढ बसते, ती याच शक्तीमुळे. गोकुल-Cow family ' गाई मशींची जात. चेतनाशक्ती व चैतन्य- Energy, activity' ज्या शक्तीच्या योगाने प्राण्यांच्या व वनस्पतींच्या जीवनकलहांतील सर्व व्यापार शक्य होतात ती शक्ती. जठर रस-Gastric juice ' पोटांत उत्पन्न होणारा एक रस याचे साहाय्याने अन्न पचते. दुग्ध पिंड- Mammary gland ' कांसेंत असणारा पिंड यांत दूध उत्पन्न होते. दुग्ध पेशी- Acini ' दुग्धपिंडाचा अंतिम मुख्य भाग. येथेच दूध तयार होते. दग्धारल-Lactic acid ' दह्यास व ताकास आंबटपणा आणणारा पदार्थ. हा दुधांतील साखरेच्या निघटीकरणाने तयार होतो. दुग्धाम्ल जंतु-Lactic Bacteria.' ज्या सूक्ष्मजंतूंच्या योगाने दुधांत असलेल्या साखरेपासून 'दुग्धाम्ल' तयार होते ते जंतु. नायट्रोजनयुक्त पदार्थ-'Nitrogenous, Nutritious matter Albuminoids' अन्नांत असलेली पौष्टिक द्रव्ये. निरिद्रिय द्रव्ये- 'Inorganic matter ' खनिज द्रव्ये, विकल सच- Starch 'आरारूट, तवकील वगैरे सारखा वनस्पती पासून निघणारा पांढरा पिठासारखा पदार्थ. पित्त- Bile' यकृत पासून तयार होणारा आंबट, कडवट पातळ पदार्थ. पेशीघटक द्रव्य-'Cellulose ' कापूस, भेंड वगैरे ज्या पदार्थांचे पाव झालेले असते ते. पक्रिया रस- Pancreatic Juice ' .