पान:दूध व दुभते.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वें.] दुधाची परीक्षा. खप हलवितात. गंधकाचे तेजाबामुळे दुधांतील काही घटक द्रव्यांवर रासायनिक परिणाम होऊन ते सर्व मिश्रण अगदी काळे होतें, व पुष्कळ उष्णता त्यांत उत्पन्न होते. एकसारखें. मिश्रण तयार झाल्यावर ती स्टेटटयूब 'व्युटिरामिटर । नांवाच्या यंत्रांत घालून खूप वेगानें ३।४ मिनिटें फिरवितात. या फिरविण्याने त्या मिश्रणांत असलेले सर्व ओशट पदार्थ त्या टेस्ट टयुबच्या असंद भागांत जमतात. या अरुंद भागावर अंशाच्या खुणा असतात; त्यावरून तपासलेल्या दुधांत ओशट-बिंदूंचे शेकडा प्रमाण काय असते ते तेव्हांच कळते. इतके झाल्यावर पहिल्यानदा काढलेले विशिष्ट गुरुत्त्व, उष्णतामान व ओशट बिंदच्या काढलेल्या शेंकडा प्रमाणावरून 'मिल्क स्केल ! नांवाच्या सळपटीचे योगाने त्या दुधांत असलेल्या पाणीविरहित इतर सर्व पदार्थाचें प्रमाण काढता येते, व त्यावरून दुधांत किती पाणी मिसळले आहे ते तेव्हांच कळतें. दधांत घातलेल्या भेसळीबरोबर व दुसऱ्या अनेक प्रसंगी ( या प्रसंगांचा निरनिराळ्या प्रकरणांत पुष्कळ ठिकाणी उल्लेख आलेलाच आहे, द्धामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या सूक्ष्म जंतूंचीही बाजे जाण्याचा पष्कळच संभव असतो. अशा जंतूंपैकी पुष्कळ निरनिराळे रोगही उत्पन्न करणारे असण्याचा संभव असतो, व सांथीच्या दिवसांत तर तो फारच असतो. अशा दिवसांत वरीलप्रमाणे तपासणी करून दांत रोगजंतही आहेत की काय, याचीही परीक्षा केली पाहिजे. अशा परीक्षेत अति उत्तम प्रतीचे सूक्ष्मदर्शक यंत्र लागते, व निरनिराळे रोगजंतु कसे असतात याची माहिती असावी लागते. एकमेकापासून निरनिराळे रोगजंतु ओळखण्याची चिन्हें फारच कठीण असतात. अशा प्रकारची सामुग्री ठेवून दुधाची परीक्षा करणे हे साधारण स्थितीतल्या कुटंबास अगदीच अशक्य आहे सरें, परंतु म्युनिसिपालिट्यांसारख्या संस्थांची मात्र तशी गोष्ट नाही. प्रत्येक म्युनिसिपालिटीने वरील उपकरणांचा संच करून आपल हट्ठीत येणान्या दुधाची जर-( निदान मिसळलेल्या करितां तरी )-तपासणी केली तर दूध विकत घेणान्या लोकांवर मोठेच उपकार होतील व अशा रीतीने रोगांचाही फेलाव कमी होऊन म्यनिसिपालि. टीस आपले कर्तव्यकर्म करीत असल्याचे श्रय येईल. इकडे सर्व कर्तव्यदक्ष म्युनिसिपालिट्यांनी अवश्य लक्ष्य द्यावें. Thre