पान:दूध व दुभते.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण wwwrww wwwww १. वर दिलेल्या आंकड्याप्रमाणे खरी वस्तुस्थिति असेलच असे नाही. कारण, या यंत्राची सर्व मदार विशिष्टगुरुत्वावरच असते व तपासल्या जाणा-या दुधाचे विशिष्ट गुरुत्वही त्याच्या उष्णता-मानाप्रमाणे बदलतच असते. याकडे बहुतेकांचे लक्ष्य नसते व दूध तपासण्याचे वेळी त्याचे उष्णतामान काय आहे याकडे जर लक्ष्य दिले नाही, तर दूध तपासण्यापासून निघणारे अनुमान बरोबर निघणे कधीही शक्य नाही. दूध जरी चांगले असले व त्याचें उष्णतामान जर ८०।९० अंशावर असले तर या यंत्राने ते दूध शुद्ध आहे असें अनुमान कधीही निघणार नाही. याशिवाय चांगलें दूध जर स्थिर ठेऊन वरचा साखा काढून घेऊन आत पाणी ढकलले, तर अशा दुधाचे उष्णतामान ६० अंशावर आणून सुद्धा या यंत्राने ते दूध शुद्धच आहे असे अनुमान निघेल व वस्तुस्थितीच्या अगदी उलट निकाल होईल. म्हणून अशा प्रकारची लबाडी या यंत्राने उघडकीस येणे शक्य नाही. याचे कारण असे आहे की दुधावरील साखा काढून घेतल्याने त्यांतील हलक्या द्रव्यांचें ( ओशटबिंदूंचें) प्रमाण कमी होते व त्यामुळे अशा दुधाचें विशिष्टगुरुत्व ज्यास्त वाढते. चांगल्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व ६० अंश उष्णतामान असतांना १०३२ असते व त्याच दुधावरचा साखा काढून घेऊन उष्णतामान जर ६० अंश ठेविलें तर त्या विशिष्ट गुरुत्त्व १०३२ पेक्षां पुष्कळच ज्यास्त वाढते व थोड थोडे पाणी घालीत गेले असतां बरोबर पुन्हा तें १०३२ वर आणता येते. असले कसब " लॅफ्टा मिटरने” मुळीच ओळखता येत नाही. म्हणूनच हैं यत्र दुधाच्या ख-या परीक्षेस अगदी कुचकामी आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. नवीन रीतींपैकी खात्रीलायक एक रीत आहे. या रीतीने दुधाची परीक्षा करण्यास खाली दिलेल्या उपकरणांची जरूरी लागते. १ विशिष्ट-गुरुत्व-मापक यंत्र - २ उष्णता-मापक यंत्र । ३ 'ब्युटिरॉमिटर । व त्याचे सामान. ४ 'मिल्क स्केल ' दूध प्रथम एका भांड्यांतून दुसन्यांत ओतून पुन्हा पहिल्या भांड्यांत घालतात. असे ३।४ वेळ केल्यावर त्याचें उष्णतामान व विशिष्ट गुरुत्व काय आहे, हे काढून टिपून ठेवितात. नंतर एका व्युटिरामिटर टेस्ट टयूब मध्ये अनुक्रमें गंधकाचा तेजाब १० क्युबिक सेंटीमिटर, दध ११ क्यूबिक सेंटीमिटर, व " अमाइल अल्काहॉल " १ क्यूबिक सेंटीमिटर घालून रबराचा एक घट्ट बूच बसवितात, व एका फडक्यांत ती टेस्ट ट्यूब धरून