पान:दूध व दुभते.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वें.] दुधाची परीक्षा. wwwwwwwwwwwwwnoarana 'लॅक्टामिटर ' असे म्हणतात) व दुधाची परीक्षा करण्यांत याचा उपयोग पुष्कळ लोक करितात. विशिष्ट-गुरुत्व-मापक यंत्रासारखेच ' लॅक्टामिटर' असते; परंतु त्यावरील अंशाच्या खुणा मात्र अगदी वेगळ्या असतात. हे यंत्र ज्या शास्त्रीय तत्त्वावरून तयार केले आहे, ते तत्त्व असें आहे की दुधांतील घटकद्रव्यांचे परस्पर प्रमाण बदलले की त्यांचे विशिष्टगुरुत्वही बदलते. यावरून ज्या दुधांत पाणी मिसळले असेल त्याचे विशिष्ट गुरुत्व शुद्ध दुधापेक्षा अगदी निराळेच असले पाहिजे. असे जरी आहे तरी सदरहू यंत्राने नेहमीच खरी. परीक्षा होते असें मात्र मानूं नये, कारण याची सर्व मदार दुधाच्या विशिष्ट गुरुत्वावर असते व दुधाचे विशिष्ट गुरुत्व हे पुष्कळ कारणांनी कमी ज्यास्ती होत असतें व बदलताही येते. ते कसे ते आपण पाहूं. मागें सांगितल्याप्रमाणे दूध हे पुष्कळच निरनिराळ्या द्रव्यांचे झालेले आहे हे लक्षांत असेलच. अशा द्रव्यांपैकी काही विरलेल्या स्थितीत असतात, काही तरंगत असतात व कांही अर्धवट स्थितीत असतात. शिवाय यापैकी काही पाण्यापेक्षां जड आहेत व कांहीं ( ओशट पदार्थ) पाण्यापेक्षा हलकी आहेत. तेव्हां जर हलक्या द्रव्यांचे प्रमाण ज्यास्त झाले तर नेहमीपेक्षां विशिष्ट गरुत्व कमी होईल व जड विरणान्या पदार्थाचे प्रमाण ज्यास्त झाले तर ते ज्यास्त होईल. है द्रव्यांचे प्रमाण जनावरांच्या जातीप्रमाणे बदलते. स्वाभाविकरीत्या एखाद्याच जनावराचें ध त्याच जातीच्या इतर जनावरांपेक्षां निराळ्या प्रकारचे असते. इतकेच केवळ नव्हे, तर एकाच जनावराची धार काढतांना पहिल्यानदां निघ सा-या दधांतील घटकद्रव्यांचे परस्पर प्रमाण शेवटी शेवटी निघणान्या दुधापेक्षा कितीतरी वेगळे असते. तेव्हां अर्थातच दोहोंचें विशिष्टगुरुत्वही भिन्न असलेच पाहिजे. याशिवाय गुरांचे आरोग्य, चारा-पाणी, हवामान वगैरे कारणानाही तें थोडेतरी बदलत असते. यावरून दुधाचे विशिष्टगुरुत्व पुष्कळच गोष्टींवर अवलंबून असते हे ध्यानात येईल. असो. दधाची परीक्षा करितांना सदरहू यंत्र दुधांत सोडतात व एके ठिकाणी तें थांबल्यावर दुधाच्या सपाटीबरोबर दिसणान्या अंशावरून दुधांत किती पाणी मिसळले आहे ते समजतें. ते असें:W म्हणजे बहुतेक सर्व पाणी पाणी व दूध KINERI PIONOKI --!! ©I-Ew शुद्ध दूध, मलाईविरहित दूध