पान:दूध व दुभते.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण प्रकरण ११ वें दुधाची परीक्षा. HO मुख्यत्वेकरून दुधांत मिसळला जाणारा पदार्थ पाणी हाच आहे. भेसळ करितांना चांगल्या दुधांत पाणी मिसळतात किंवा त्यावरील साखा काढून घेऊन नंतर त्यांत पाणी मिसळतात.कचित् प्रसंगी पाणी घातल्यावर दुधास चव आणण्याकरिता त्यांत थोडीशी साखरही घालतात, नेहमीच्या प्रचारांत दुधामध्ये पाणी घातले आहे किंवा नाही हे पाहण्याकरितां थोडे दूध जमिनीवर अगर भिंतीवर टाकून पाहतात व लागलेच ते जिरले तर त्यांत पाणी आहे असे समजतात, कधी कधी बोटाचे नखावर अगर कांचेवर थेंब टाकून तो जर चोहोकडे पसरला तर द्धांत पाणी आहे असे मानतात. या व अशा प्रकारच्या तपासणीवरून विशेष काही माहिती मिळत नाही. व यावर विशेष भरंवसाही ठेवितां येत नाही. कारण त्यांत दुधाच्या पातळपणाशिवाय दुसरे काहीच कळत नाही. याशिवाय या परीक्षेच्या वेळी दुधाचा अगदी वरचाच थर बहुतेक तपासला जातो व त्यामुळे फसवणूक होते. याचे कारण असे आहे की, दूध जरा स्थिर राहिले की त्यात असलेले ओशट बिंदु अगदी वरचे भागांत जास्त जमतात व त्यामुळे सर्वच दूध चांगले असावे असा गैरसमज होतो. दूधवाला सुद्धां गि-हाइकांस फसविण्याकरितांच वरचेच दूध घेऊन जमिनीवर टाकतो, व गि-हाईक फसत. अशा वेळी, निदान ते सर्व दूध दुसन्या भांड्यांत ओतावें व पुन्हा परत पहिल्या भाड्यात घालून नंतर परीक्षा करावा. असे केल्याने दुधांतील सर्व ओशट बिंदसव भागात एकसारखे मिसळून फसणक होत नाही. दुधावर चांगली साय आला नाही किंवा ताकावर नेहमी सारखा लोण्याचा गोळा आला नाही, तर बायका लागलीच मेसळीविषयी शंका घेतात, व त्यांचे म्हणणे बहुतेक अंशी अगदी बरोबर असते. हलवाई लोक मोजक्या दुधापासून काही विशिष्ट प्रमाणांत खोवा पडला तरच ते दुध चांगले आहे असे समजतात. ह्या शेवटच्या दोन पद्धति जवळ जवळ खात्रीलायकच असतात. कारण त्यामध्ये दुधाताल काही पदार्थाच्या प्रमाणांचा ठोकताळा बसवून नंतर त्याच्याशी तुलना केली जाते. ___ या व्यावहारिक रीतीशिवाय शास्त्रीयतत्त्वावर बसविलेल्या दुसन्याही पद्धति आहेत; त्यांपैकी काहींचा येथे थोडक्यात विचार करूं. 'दुधांतील पाणा मोजण्याचे यंत्र' म्हणून बाजारांत एक यंत्र मिळत असते (यास इंग्रजात