पान:दूध व दुभते.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. . “दूध व दुभते " या विषयासंबंधी कित्येकांस थोडी तरी माहिती असतेच. गाई, मशी वगैरेपासून दूध काढतात, दूध तापवून ते विरजतात, विरजून दही झाल्यावर त्यापासून ताक, लोणी निघतें व लोण्यापासून तूप तयार होतें, वा. पलीकडे शेकडा ९० माणसांस तरी ज्ञान असेल असे वाटत ताही. मग दूध हा एकच पदार्थ आहे, की तो अनेक पदार्थाचा तयार झालेला आहे, जनाव - रांच्या चाऱ्याचा आणि दुधाचा काय संबंध आहे, दूध कसे तयार होते, दुधाचा आणि निरनिराळ्या सूक्ष्म जंतूंचा कोणत्या प्रकारचा संबंध आहे, दुधाच्या स्वच्छतेविषयी विशेष खबरदारी का घेतली पाहिजे, वगैरे महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान शेंकडा एकास तरी असेल की नाही याची शंकाच आहे. दुधाची धार काढल्यापासून तों तहत तें मनुष्याच्या पोटांत जाईपर्यंत प्रत्येक बाबतीत विशेष खबरदारी घेतली नाही, तर ते दृषित होण्याचा संभव असतो. त्यांतील मुख्य गोष्टी म्हटल्या म्हणजे घाण पाण्याने धुतलेली व खराब फडक्याने पुसलेली अगर दुसऱ्या पदार्थांनी करवडलेली भांडी, धार काढणाराचा घाणेरडेपणा व त्याचे अगर त्याचे घरांतील मंडळींचे सांसर्गिक रोग; दुधांत पाणी मिसळणे, रस्त्यांतून दूध उघडे नेणे व त्यावर निरनिराळ्या ठिकाणच्या माशा बसणे व वाऱ्याने ठिकठिकाणचा केरकचरा दुधांत पडणे, दूध घालीत असतांना दुधांत बोटे घालणें, अगर दुसन्यास घालूं देणे, दूध वाटतांना मा जमिनीवर ठेवणे व पुन्हा दुधाच्या भांड्यात टाकणे, वगरे हलगर्जीपणा दूध घरांत येईपर्यंत होतो, दूधवाला घरी आला म्हणजे तेव्हांपासुन घरच्या hc