पान:दूध व दुभते.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ दूध व दुभते. [प्रकरण. wwwwwwwww पासून वेगळे होतात. आपण गोफण फिरवून तिचा एक पदर तो फिरत असतांना सोडल्याचरोबर आंतील दगड जसा दूरवर फेकला जातो, त्याप्रमाणेच दघाचे घटक त्या फिरत्या भांड्यांचे परिघाकडे फेकले जातात. व ओशट दि. सारख्या हलक्या पदार्थावर त्या शक्तीचा कमी परिणाम होऊन ते सर्व बिंद त्या भांड्याचे मध्याकडे आपोआप ढकलले जातात. त्या भांड्यांतन के दोनही भाग-ओशट बिंदू व ओशट बिंदूविरहित दूध-निरनिराळ्या ठिकाणी जमा होऊन ते दोन नळ्यांवाटे वेगळे वेगळे बाहेर पडतात. वर सांगितलेल्या फिरत्या भांड्यांत मई दध एकदम न घालतां ते एका निराळ्याच भांड्यात ठेवलेले असते व त्यांतून एका नळीचे द्वारे त्या फिरत्या भांड्यांत त्याचा प्रवाह सोडलेला असतो. जोपर्यंत हा प्रवाह कायम असतो व ते भांडे फिरत असते, तोपर्यंत ओशटबिंदूंचे विभक्तीकरण एकसारखें चालू राहून एका बाजूस “ मलाई' व दुसऱ्या बाजूस ओशट बिंदूविरहित दूध बाहेर पडत असते. या प्रमाणे थोड्या वेळांत मणांचे मण कच्च्या दुधापासून मलाई काढून घेता येते. ज्या ठिकाणी अशा प्रकारची यंत्रे आहेत त्या ठिकाणी यंत्रांतून बाहेर पडणान्या ओशट बिंदुविरहित दुधास “ गिरणीचे दूध” असें म्हणतात. या रीतीने दुधापासून " मलाई " तयार करण्यास दुधाचे उष्णतामान ९० डिग्री ठेवावे लागते. गिरणीचे दूध, ___ अशा प्रकारच्या दुधांत ओशट बिंदूंचे प्रमाण शेकडा ० २ अगर ०-३ फार तर असते. म्हणून अशा दुधाची अन्नाचे दृष्टीने किंमत कमी होते असें मुळीच समजू नये. कारण ओशट बिंदू काढून घेतल्यामुळेच दुधातील इतर घटक द्रव्यांचे शेंकडा प्रमाण जास्त वाढते, व तें दूध जास्त सकस होते, कोणत्याही अन्नाच्या पौष्टिकपणाची किंमत त्यांत असलेल्या नायट्रोजनयुक्त पदार्थावरच असते. म्हणून या नायट्रोजनयुक्त पदार्थाचे शेकटा प्रमाण कसें वाढतें तें पाहं. समाजा की दुधांत ओशट बिंदूचे प्रमाण शेकडा ७ ४६ व नायट्रोजनयुक्त पदार्थाचे शेकडा ४.५९ आहे. असें अस्सल १०० शेर दूध घेतले व त्यांतून फक्त ७.४४ शेर ओशट बिंदू जर काढून घेतले, तर ६२.५६ शेर गिरणीचे दूध राहते व त्यापैकी ४-५९ शेर नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात. म्हणून अस्सल दुधापेक्षां गिरणाचे दुधांतील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे 'शेकडा प्रमाण ' ४-५९ पेक्षा जास्त झालेच पाहिजे. असो. गिरणीच्या दुधाचा खप आपलेपेक्षां युरोपियन लोकांत फार होतो. डॉक्टर लोक रोगी लोकांना असल दूध वापरण्यास सांगतात. गवळी लोक हे दूध दहीं करून विकण्यास घेतात व हलवाई लोक खवा करण्याकडे त्याचा उपयोग करितात. शहरांतून वाटेल तसले