पान:दूध व दुभते.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें.] दुभते-विलायती पद्धत. शिजलेल्या बटाट्यांचा बलक, शिजविलेले अळवाचे गड्डे, वगैरे पदार्थ मिसळलेले आढळतात; व चरबीसारखे ओंगळ पदार्थ सुद्धा कांहीं लबाड व्यापारी त्यांत मिप्तळतात. प्रकरण ९ वें. दुभतें-विलायती पद्धत. बॉलंड, अमेरिका वगैरे सारख्या सुधारलेल्या देशांतून दुधापासून लोणी में करितात, व त्यांचे पद्धतीत आणि आपले देशी पद्धतींत कोठे फेरफार असतो, ते पाहूं. ह्या नवीन पद्धतीत दूध मुळीच तापवीत नाहीत. देशी पद्धतीत दध तापवल्यानंतरच पुढचे कामास सुरुवात होते. दोनही पद्धतीत दुधांतील मम ओशटाबंदु निराळे करून त्यांपासून मग लोणी तयार करतात. परंत देशी पद्धतीत दूध तापवून सायीबरोबर हे बिंदु वेगळे केले जातात आणि विलायती पद्धतीत दूध न तापवितां कच्या दुधापासूनच ते निराळे करितात मलाई काढण्याची विलायती पद्धत. शाच्या दोन रीति प्रचारांत आहेत. पैकी ( १) दूध एखादे भांड्यांत स्थिर ठेवून आणि (२) यंत्राचे सहायानें. - पहिली:-ह्या पद्धतीत दूध उथळ किंवा खोल मड्यांत घालन बारांपासन चोवीस तास ते अगदी स्थिर ठेवितात व ओशट बिंद दधाचे इतर घटकद्रव्यांपेक्षा हलके असल्यामुळे ते सर्व दुधाचे वरचे भागांत जमतात व त्यांचा एक थरच बनतो. यासच इंग्रजीत "कोम" (मलाई. साखा) म्हणतात. ही मलाई चमच्याचे सहायाने वेगळी करतात. ह्या पद्धतीत न फारच थंड ठेवावे लागते व वेळ पुष्कळ लागून नासण्याचा संभव असतो. आपल्या इकडील हवामान ऊष्ण असल्यामुळे ह्या पद्धतीपासून नकसानच होईल युरोपांतील थंड हवेच्या देशांतून सुद्धा ही पद्धत प्रचारांतून जाऊ लागली आहे. पद्धत दुलरी:-ह्या पद्धतींत एका भांड्यास यंत्राचे सहायाने चक्राकार गति देतात; ती इतकी तीव्र असते की, त्या भांड्याचे एका मिनिटांत ६००० वर फेरे होतात; व इतकी मोठी गति दिल्यामुळे केंद्रोत्सारिणी शक्ति उत्पन्न होऊन त्या शक्तीचा परिणाम दुधाचे घटक द्रव्यावर होतो, व ते हलके पदार्था