पान:दूध व दुभते.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ दूध व दुभते. [प्रकरण असतां तेव्हांच उडून जातें, व त्याचा दिवा तेंव्हांच लागतो, ह्याच्या अगदी उलट एरंडेल तेलाची स्थिति आहे. त्याप्रमाणेच लोण्यांत असलेल्या निरनिराळ्या ओशट पदार्थाचा उष्णतेशी संबंध आहे. आतां लोण्यापासून "तूप') करण्यास उष्णतेची जरूरी असते व ही उष्णता लोणी कढवतांना जर थोडी जास्त झाली तर लोण्यांतील काही घडक द्रव्यांची वाफ होऊन ती द्रव्ये हवेत उडून जातील व तुपाचा स्वादिष्टपणा नाहीसा होईल. या शिवाय जास्त उष्णता लागल्याने कांही भाग जळून तुपास अतिशय घाणेरडा वास लागण्याचा फारच संभव असतो. एवढ्याकरितां लोणी कढवतांना जास्त खबरदारी घेतली पाहिजे. लोणी अगदी मंदाग्नीवर कढविलें असतां आंतील पाणी सावकाश उडून जाते व लाण्यांतील काही भाग न उडतां व न जळतां स्वादिष्ट तूप तयार होते. तूप कणीदार होणे किंवा न होणे हे जनावरांच्या जातीवर, त्यांच्या खाण्यावर व हवामानावर अवलंबून असते. येथे तुपाचा व त्याचे बाजारभावाचा संबंध कसा काय आहे, यासंबंधार्ने थोडासा विचार केल्यास काही वावगे होणार नाही. ज्या प्रमाणांत ओशट पदार्थ दुधांत असतात, त्या प्रमाणापेक्षा जास्त तप दुधापासून निघणे हे कधीही शक्य नाही. किंबहुना ते उलटें कमीच असले पाहिजे. कारण दुधापासून तुपाची स्थिती येईपर्यंत ओशट पदार्थाचा थोडासा तरी भाग इकडे तिकडे जाईल. म्हणजे रुपाया किंमतीच्या दुधापासून रुपाया किंमतीचे तूप निघणे अगदी अशक्य गोष्ट आहे. इतकेच केवळ नव्हे तर ताकाची किंमत वजा करून शिल्लक राहील तितक्या किंमतीचे सुद्धां तूप निघणार नाही. यावरून कोणी असें म्हणतील की, बाजारचे सर्व तुपांत भेसळ असलीच पाहिजे. सर्वच बाजारचे तुपांत भेसळ असतेच असे नाही, तर पुष्कळशा ठिकाणी ती असलीच पाहिजे. व या विषयासंबंधी बोलतांना य. पी. चे ऑग्रिकलचरल डायरेक्टर साहेबांनी असले ओंगळ मिश्रण “शुद्ध तूप " म्हणून खाण्यापेक्षा सरकीपासून केलेले लोणी खाणे बरें, अशा आशयाचे उद्गार गेल्या अलाहाबाद प्रदर्शनांत भरलेल्या अॅग्रिकल्चरल कॉन्फरन्समध्ये काढलेले आहेत. असो, आतां कांही ठिकाणी इतके तूप कसे द्यावयास परवडते ते पाहूं. ज्या ठिकाणी मुबलक व स्वस्त चराऊ रान आहेत व दुधासही गिन्हाईक नाही, अशा ठिकाणी शेकडों दुभती जनावरे राखण्यास कठीण मुळीच पडत नाही. धंदेवाले लोक अशा ठिकाणी कळपाचे कळप ठेवून त्यांचे दुधापासून तूप तयार करितात व ताकासारख्या पदार्थांचा उपयोग आपला चरितार्थ चालविण्याकडे करितात, असे लोक तूप बाजारभावापेक्षा थोडेसे स्वस्तच व्यापा-यांस देतात. यावरून बाजारचे सर्व तुपांत भेसळ नसते असे समजू नये. त्यांत तेल, पाणी, पीठ,