पान:दूध व दुभते.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ www ८ वें.] दुभते-देशी पद्धती. wwwwwwwwwwww असणान्या जंतूमुळे नासते हे पुष्कळांनी पाहिले असेल. या सर्व गोष्टी वरून जणे म्हणजे काय व त्यापासून काय घडते याविषयी साधारण कल्पना होईल. - लोणी काढणे. विरजण रवीने घुसळून लोणी काढतात. हे सर्वांस माहीत आहेच घुसळण्याच्या क्रियेत घट्ट झालेला नायट्रोजनयुक्त पदार्थ फुटन त्याचे बारीक बारीक कण होऊन पाण्यात मिसळतात व विरजणास पातळपणा येतो. व सायींत अडकलेले ओशटबिंद मोकळे होतात. शिवाय घुसळण्याने विरजणाचा एक भाग दुसरे भागावर सारखा आपटत असतो, त्यामुळे मोकळे झालेले ओशटबिंद एकमेकावर आपटून एकमेकास चिकटतात. व त्याचे गोळे बनतात व "लोणी" यारूपाने वर तरंगत राहतात. लोणी लवकर येण्यास काही विशिष्ट उष्णता असावी लागते म्हणूनच हवेचे मानाने थंड किंवा कढत पाणी ताक करतांना घालावें लागते. उष्णता फार असली तर ओशटबिंदु फार पातळ होऊन एकमेकांस चिकटत नाहीत व चिकटले तर लागलेच निराळे होतात. फार थंडीने ते इतके कठीण होतात की, जरी ते एकमेकावर आपटले तरी बैदुलाप्रमाणे टक्कर खाऊन चोहोकडे फिरत राहतात. असो. कोणी तयार झाल्यावर ते चांगले पुष्कळदां स्वच्छ पाण्यांत धुवावे, म्हणजे चकर नासत नाही. त्यांतील धुण्याने आंबटपणा घालवला पाहिजे. मेणचट लोणी नीट धुता येत नाही व ओंगळ वाटते. लोणी करण्याचे कामांत हलगजीपणा न केल्यास ते चांगले दाणेदार घट्ट निघून ते चांगले धुतले जाते, व पनि पसंत पडते. लोणी काढणा-याच्या हातांच्या स्वच्छतेवर लोण्याचा जास्त दिवस टिकण्याचा गुण पुष्कळ अंशी अवलंबून असतो. कारण निरनिराळ्या त-हेचे अगणित जंतू आपले हातावर असतात (ते स्वच्छ न धतल्यास ) व लोणी काढताना त्यांत मिसळून त्याचे विघटीकरण करून सारी घाण करून टाकतात. एवढ्याकरितां ताक करणाराने ताकाची आयधेप आपले हात नेहमी स्वच्छ ठेवण्याची फार खबरदारी ठोविली पाहिजे. तूप. ज्याप्रमाणे प्रचारांत दूध हे एकच पदार्थाचे आहे, असे समजले जाते. त्याचप्रमाणे लोणी सुद्धां एकाच पदार्थाचे बनलेले आहे, असा सर्व साधारण समज आहे, परंतु तशी गोष्ट मुळीच नाही. रसायनशास्त्राचे योगाने " लोणी, हा पदार्थ पुष्कळशा निरनिराळ्या ओशटपदार्थाचा झालेला आहे हे सिद्ध करून दाखविता येते. या निरनिराळ्या आशटपदार्थांचे गुणधर्म एकमेकापासून अगदी भिन्न आहेत. ज्याप्रमाणे आपल्या नेहमीच्या प्रचारांतले रॉकेल तेल सांडले