पान:दूध व दुभते.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें.] धार काढणे व दुधाची व्यवस्था. (५) दोन्ही हातांनी धार काढावयाची असल्यास एकाच बाजूची दोन्ही किंवा पुढची अगर मागचीच दोन्ही आंचळे धरून धार काढू नये. एका बाजूचें पुढचें आंचळ जर एका हातांनी धरले तर दुस-या बाजूचे मागचें आंचळ दुसन्या हाताने धरावें व एका मागून एकाची धार काढावी. दोन्ही आंचळाची एकदम धार काढू नये. (६) कांसेंत शेवटी मुळीच दूध उर्स देऊ नये. कारण एकतर शेवटचे दांत ओशटबिंदूंचे प्रमाण अधिक असते व दुसरें तें राहिलेलें दूध आंचळांत नासावयास सुरुवात होते व त्यामुळे ती सुजतात. ज्या गाईस पिणारे वांसलं नसते, तिच्याविषयी या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी, धारेनंतरची व्यवस्था व दुधाविषयी खबरदारी. धार काढल्यानंतर दूध मापण्यापेक्षा त्याचे वजन करावे. कारण फेसामुळे मापांत फरक पडतो. रोजचे रोज वजन करीत गेल्यास पुष्कळ फायदा होतो. कारण एखादे दिवशी जर एखाद्या जनावराने दूध कमी दिले, तर तें कां कमी झाले याचे कारण शोधून काढण्यास ठीक पडते. एखादे वेळेस जनावर आजारी असते, त्यावर वेळीच उपाय झाला तर ते दुखणे लवकर नाहीसे होते. शिवाय दुधाचे मानाने पेंड वगैरेचा रतीब जनावरास किती दिला पाहिजे, हे ठरविण्यास ठीक पडते. वजन केल्यावर दूध चांगल्या स्वच्छ फडक्यांतून गाळून ठेवावे. पुष्कळदां बाहेरचा कचरा व केस दुधांत पडतात ते अशाने दूर होतात. नंतर दूध स्वच्छ जागेंत झांकून ठेवावे. केर वगैरे वान्याने आंत जाणार नाही अशी व्यवस्था ठेवावी. कोंदट व दमट जागा अगदी वर्ण्य समजावी. कारण अशा जागेंत निरनिराळ्या रोगविजांची उत्पत्ति होते, व निरनिराळे घाणेरडे वायु निघत असतात. रोगजंतूंची वाढ दुधांत फारच झपाट्याने होत असते व घाणेरडे वायु शोपून घेण्याचा धर्म दुधाचे अंगी फार असतो, त्यामुळे दुधाचे योगाने असल्या रोगाचा फैलाव फारच झपाट्याने होतो. सांथीचे रोगाचे दिवसांत व पावसाळ्यांत दूध फारच काळजीपूर्वक ठेविले पाहिजे. महामारीसारखे रोग दुधावाटेच चोहोकडे पसरतात. दूध वाटण्याकरितां घरोघर नेत असतांनां में जर नीट झांकून नेलें नाही, तर निरनिराळ्या जिनसांवर बसलेल्या माशा दधावर येण्याचा फारच संभव असतो, व ह्या माशा दूध खराब करण्यास कारणीभूत होतात. घरोघर दूध वाटतांना मोजावयास दांडा असलेली मापें फारच उत्तम होत. कारण अशाने दुधास हात लागण्याचा फारच कमी संभव असतो. दुधाचें माप मोठ्या चरवीत टाकण्याची वहिवाट अतीच वाईट. कारण अशी मापें दूधमोजणे झाल्यावर साली जमिनीवर ठेवणे फार संभवनीय असते व निरनिराळ्या