पान:दूध व दुभते.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण ا میه یه ی ب باميه ميه ميه (२) ज्या भांड्यांत धार काढावयाची असेल ती भांडी चांगली स्वच्छ घांसलेली व कोरडी केलेली आहेत किंवा नाहीत हे पाहिले पाहिजे. त्यांस कोणत्याही प्रकारचा वास येता कामा नये. (३) ज्या मनुष्यास धार काढावयाची असेल, त्याने आपले हात धुवून स्वच्छ केले पाहिजेत. आपले स्वतःचे किंवा गुरांचे अंग खाजवून किंवा चोळून हात धुतल्याशिवाय कधीही धार काढू नये. कारण नखांत व बोटांवरील चिरम्यांत मळाचा पुष्कळच भाग जाऊन बसलेला असतो. तो दुधाबरोबर मिसळून ते घाणेरडे होते. (४) धार काढण्यापूर्वी जनावराची कांस व आंचळे चांगली धवून स्वच्छ कोरडी करावी म्हणजे त्यांवरील मळ वगैरे सर्व निघून जातो. गाई-म्हशी नेहमी शेणांत-मुतांत बसतात, त्यामुळे त्यांची आंचल व कांस ही बहुतेक घाणेरडी असतात. शिवाय गवताचें कुसळ अगर चिपाडाची सडी एखादे वेळेस आंचळास टोचलेली असते, ती धार काढतांना आंचळास टोचन इजा होते. असले प्रकार धार काढण्याचे वेळीं कांस नीट धुतल्याने होण्याचा संभव राहत नाही. (५) धार काढण्यापूर्वी गाईना कोणत्याही प्रकाराने न बजविण्याची खबर. दारी घेतली पाहिजे. लाथाळ व धिप्पाड गाईचे मागचे पायांस आळा बांधावा. धारः-चांगली धार काढणे हे मुख्यत्वेकरून संवयीवर अवलंबून असते. चांगली धार काढणारा मनुष्य थोड्या अवकाशांत, आपल्या हातास फार श्रम न देतां व जनावराची आंच न दुखवितो पान्ह्यांतील सर्व दूध काढतो, हे सर्व अनुभवाशिवाय कळणे शक्य नाही. तरी नवीन सुरुवात करणारांनी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेविल्या पाहिजेत. (१) आंगठा व पहिले बोट यामध्ये आंचळ धरून धार काढू नये. कारण अशा रीतीने आंचळ खाली ओढले जाते व गाईस इजा होते. (२) हाताची चारी बोटें व दुमडलेला आंगठा यांमध्ये आचळ धरून धार काढावयाची असल्यास आपल्या आंगठ्याचे हाड आंचळांस न बोचेल अशा बेतानेच दाब दिला पाहिजे. नाहीतर धार काढण्याचे भरांत न कळत जास्त दाब एखादेवेळेस बसतो व गाईस तो सहन न झाल्यामुळे ती उडी मारते. (3) आंचळ मुठीत धरून धार काढण्याने कोणत्याही प्रकाराने जनावरास इजा होण्याचा संभव नसतो, व संवयीने फारच जलद दूध काढता येते. धार काढणा-या मनुष्याची नखे कधीही वाढलेली नसली पाहिजेत. (४) विसांदा घेत कधीही धार काढूं नये. असे केल्याने दूध कमी होते.