पान:दूध व दुभते.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ दूध व दुभते. [प्रकरण अगदीच उलट असते. वासरांच्या गरजेपेक्षा कितीतरी पट फाजील दूध तयार होत असते. ते इतके की, जर कदाचित् वासरूं चुकून सुटले व सर्व दूध प्याले, तर त्यास ते पचविण्याची मुळीच ताकद नसते, व कधी कधी तें अजीर्णामळे प्राणासही मुकतें, पाळलेल्या गाईचे दूध काढण्यास माणसे असतात व खाण्याचे लालचेनें वाजवीपेक्षां फाजील पान्हाही त्यांना सुटतो. हरिणीचे दूध तिच्या पाडसाशिवाय दुसरे कोणी प्यावयास येत नसते व चमचमीत खाणेही तिला कोणी देत नाही. गाई-मशीचे दूध वाढविण्यास मनुष्य हरत-हेनें प्रयत्न करीत आहे व त्यास यशही येत आहे. यांपैकी मुख्य प्रयत्न झाले ह्मणजे चांगली अवलाद राखणे, त्यांतल्या त्यांत चांगल्या व्यक्तींची निवड करणे व जनावरांना चांगले सकस चारापाणी देऊन त्यांची उत्तम निगा राखणे हे होत. मुख्यत्वेकरून ह्या गोष्टीनेच जास्त प्रमाणांत दूध देणारे जनावर निपजतें, व हा गुण त्या व्यक्तींत नैसर्गिकच असतो. दूध उत्पन्न होण्याचे प्रमाण शरीरांत खेळणान्या रक्तप्रवाहावर कसें अवलंबून असतें तें मागें सांगितलेच आहे. कधी कधी कांसेंतून सर्व दूध काढले नाही, तर दूध कमी व्हावयास लागते. कारण तें तेथे राहिले तर त्यांचें कांसेंत पुन्हा शोषण होते व पहिल्यापेक्षा दुध मळी कमीच तयार व्हावयास लागते, व याचमुळे चांगल्या चांगल्या गाईची काही कारणामळे जर पुरी धार काढली गेली नाही, तर त्या मुळीच दूध देईनाशा होतात व अशी उदाहरणे पुष्कळ आढळतात. जनावरांचे अंगांत पुष्कळ शुद्ध खेळत ठेवण्यास त्यांचे आरोग्याकडे व चा-या-पाण्याकडे विशेष लक्ष दिलें मारले चारा-पाणी हे सुद्धा हवामानाप्रमाणे बदलले पाहिजे. उन्हाळ्याचे दिवसांत जर नुसत्या सुक्या चान्यावरच जनावरें ठेविली, तर अर्थात त्यांचे दध कमी झालेच पाहिजे, अशावेळी ओल्या चाऱ्याचा रतीब अवश्य लावावा. तसेंच पावसाळ्याचे दिवसांत जेव्हां जिकडे तिकडे हिरवेंच हिरवे झालेले असते अशा वेळी जनावरे ओल्या चा-यावरच न ठेवता सुका चाराही प्रत्येक वि* थोडथोडा देत जावा. यावरून दूध उत्पन्न होण्याचे प्रमाण पुष्कळच गोवर अवलंबून असते असे दिसून येईल. . दुधांतील घटक द्रव्यांचे प्रमाण. निरनिराळ्या जातींच्या प्राण्यांच दूध अगदी वेगवेगळे असते. काहींचें पांढरें, कडीचे पिवळट. कांहींचे जास्त पातळ, व काहींच्यांना एक प्रकारचा वाईट वास येत असतो. काही प्राण्यांचे दूध पचण्यास जड तर काहींचे अगदी हलके असते. हे वरील निरनिराळे गुणधर्म दुधांत असलेल्या निरनिराळ्या पदार्थाच्या कमी अधिक प्रमाणावरच मुख्यत्वेकरून अवलंबून असतात. खाली दिलेल्या कोष्टकांत निरनिराळ्या घटक द्रव्यांचे शेकडा प्रमाण काय असते ते दिले आहे.