पान:दूध व दुभते.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वें.] दूध कसे तयार होते. रच्या पदार्थाच्या अधिकपणामुळे असले दूध तापविले असता त्याचा खरवत तयार करता येतो. जसे जसे दिवस अधिक लोटतात तसे तसें जीवनतत्त्वाचे विघटीकरणाची क्रिया जास्त वाढत जाते, व ओशट बिंदूंचे प्रमाण दुधांत अधिक अधिक होत जाते. यावरून गाय व्याल्यावर एक दोन महिन्यांपर्यंत तिच्या दुधापासून चांगले लोणी का निघत नाही, हे लक्षात येईल. दूध उत्पन्न होण्याची कारणे. या कारणांपैकी मुख्य कारण म्हटले म्हणजे 'मातृत्व । व 'मातप्रेम, हे आहे. हे गर्भधारणेवांचन येत नाही व ज्यावेळी गर्भधारणा होते, त्या वेळेपा. सूनच दुधाचे उत्पत्तीचे तयारीस शरीर लागते व हळूहळू कांत वाढावयाख लागून विण्याचे वेळेपर्यंत तिची पूर्ण वाढ व तयारी होते. हे सर्व फेरफार जी गाय प्रथमच फळलेली असते, तिच्यामध्ये चांगले पहावयास सांपडतात. प्रथम फळण्याचे वेळी तिची कांस अगदी बारीक असते परंतु विण्याचे वेळी तिची वाढ पूर्णतेस जाते. तरी पण नेहमीसारखें दूध पहिले काही दिवस तयार होत नाही. याविषयी मागें सांगितलेच आहे. कालवड फळण्याचे पूर्वीच तिचे आ. चळ पिळले असता त्यांतून पाण्यासारखा पातळ पदार्थ काढता येतो व तो चवीस खारटसा लागतो. दूध उत्पन्न होण्यास दुसरें कारण म्हटले म्हणजे रक्तप्रवाहामुळे कांसेस जी चेतना मिळते ती होय. कालवडींचे आंचळांतन नेहमी वरील पाण्यासारखा पदार्थ काढित गेले असता काही दिवसांनी दुधासारखा पांढरा पदार्थ बाहेर यावयास लागतो. कास हातांनी नेहमी हळुहळु चोळली असतांही कांसेस चेतना मिळून दुधासारखा पदार्थ निर्धू लागतो. शिवाय वासराचे पिण्यानेसुद्धां दूध उत्पन्न करण्याची पात्रता कांसेमध्ये येते. आपल्या वांतरास पाहिल्याबरोबर जो एक मोठा पान्हा गाईस सुटतो, त्याचे कारण मातप्रेमामुळे कांसेस जी चेतना मिळते ती होय. ही चेतना जशी वरील कार. णाम मिळते, तशा ती दुसन्या काही कारणांनीं नाहींशीही तेव्हांच होते. उदाहरणार्थः-जागा बदलणे, मनुष्य बदलणे, वासरूं मरणे वगैरे, दूध उत्पन्न होण्याचे प्रमाण. - खरोखर पाहिले असतां जितकें दूध पोरांचे पोषणास पाहिजे असेल तितकेंच उत्पन्न झाले पाहिजे, व ह्या गोष्टीचा खरेपणा रानटी जनावरे आणि पाळलेली जनावरे यांची तुलना केली असतां दिसून येतो. जंगलांतील हरिणीची कांस पाहिली असतां ती अगदीच लहान दिसते व तिच्यांतून मुळीच दूध निघत नसेल असें आपणास वाटते. परंतु जेवढें दूध पाडसाचे पोषणास अवश्य असते तेवढेच तयार होतें, फाजील होत नाही. पाळलेल्या गाईची गोष्ट ह्याच्या