पान:दूध व दुभते.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ दूध व दुभते. [प्रकरण लेल्या मज्जातंतूंकडून चेतना मिलाल्याशिवाय हा फाजील रक्तप्रवाह वाढत नाही. अशा प्रकारची चेतना जोपर्यंत मातेस आपल्या अपत्याचे संगोपन करावयाचे असते, तोपर्यंत मिळत असते, व गाय गाभण झाली की आंगावर पीत असलेल्या वासराची संवय सुटत जाते व हळूहळू दूध आटते व पुन्हां विण्यापूर्वी काही दिवस ते भावी अपत्याकरितां तयार होण्यास सुरुवात होते. आतां आपण दुधांत असलेल्या ओशट पदार्थाचा मुख्य भाग कोठे व कता तयार होतो हे पाहूं. दुग्धपेशींचे आंतले बाजूनें जो एक अतिसूक्ष्म पेशींचा पापुद्रा असतो, त्यापैकी प्रत्येक सूक्ष्मपेशीमध्ये जीवनतत्त्व असते. ज्यावेळेस दुग्धपिंडास चेतना मिळते, त्या वेळेस सजीवतत्वांत जागृति उत्पन्न होते व काहीएक विशिष्ट रासायनिक फेरफार होऊन त्या जीवनतत्त्वापासून ओशट पदार्थाचे अणुरेणुसारखे सूक्ष्मबिंदु तयार होतात. ते बिंदु दुग्धपेशींत 'सांठलेल्या शोणितद्रावाबरोबर मिसळतात व त्यामुळे त्या मिश्रणास पांढरा रंग येतो. ज्या वेळेस पेशीतील सजीवतत्त्वास चेतना मिळते, व त्यांचे विघटीकरण होऊन त्याचे ओशट बिंदु होतात, त्याच वेळेस त्या सजीवतत्त्वाचे आवरण जी 'पेशीभित्तिका । तिचे सुद्धा विघटीकरण होऊन त्यापासून साखरेसारखा गोड पदार्थ तयार होतो, व तोही त्या शोणितद्रवावरोबर मिसळतो. ह्या गोड साखरेमुळेच दुधास गोडी येते. अशा त-हेनें नायटोजनयुक्त पदार्थ निरिंद्रिय द्रव्ये, ओशट बिंद, साखर आणि पाणी यांचे जें एक मिश्रण तयार होते, तेच दूध होय. हे तयार झालेले दूध दुग्धपेशीत मावेनासे झाले म्हणजे लहान लहान नळ्यावाटे वाहत जाऊन मागें सांगितलेल्या सांठ्याच्या पोकळीत जाऊन राहते, व तेथूनच धार काढतेवेळी मांचळावाटे बाहेर पडते. आतां रक्तवाहिन्यांतून शोणितगाव पाझरण्याची क्रिया आणि जीवनबिंदपासून ओशट बिंदु आणि पेशीभित्तिकेपासून साखर होण्याची क्रिया नेहमीच एका प्रमाणात चालतात असे मुळीच नाही. कधी रक्ताचा प्रवाट जात असतो तर कधी सजीवतत्त्वाचे विघटीकरण जास्त जोराने चाललेले असते ह्मणूनच दुधांतील घटकद्रव्यांचे प्रमाण नेहमी बदलत असते. गाय व्याल्यावरचा चीक, साधे नेहमीचे दूध आणि गाय गाभण झाल्यावरचे दूध यांची परस्पर तुलना केली असतां दुधाच्या घटक द्रव्यांचे प्रमाणांत कितीतरी फरक आढळतो. याचे कारण वरील दोन्ही क्रियांमध्ये जो फरक पडतों तेच आहे गाय व्याल्याबरोबर जे रक्त गभाशयाकडे-गर्भाचे पोषण करण्याकडे जात होते, त्याचा तिकडचा प्रवाह बंद होऊन तो कांसेकडे वळतो व त्यामुळे दुग्धपेशींत शोणितद्रावाचे पाझरणे प्रथम झपाट्याने चालते; तेव्हां अर्थातच पहिल्या दुधांत (चिकांत ) नायट्रोजनयक्त पदार्थांचे प्रमाण अधिक वाढते. असल्या प्रका.