पान:दूध व दुभते.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वें.] दूध कसे तयार होते. आतां वर ज्या दूध उत्पन्न करणा-या दुग्धपेशी सांगितल्या आहेत, त्या सहस्रावधी एका दुग्ध पिंडांत असतात. ह्याचे स्वरूप चांगले लक्षांत येण्याकरितां त्या साधारणपणे नारळाएवढ्या आहेत अशी कल्पना कर नारळास जशी करवंटी असते, व तिच्यावर जशा झाडाच्या फांद्यासारख्या शिरा असतात, त्याप्रमाणे दुग्धपेशींचें बाहेरचे आवरणावर अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांचे वेष्टन असते, व नारळांत जसें खोबरें असते, त्याप्रमाणे ह्या दुग्धपेशींत आंतल्या बाजूनें सचेतन जीवनतत्त्वाने भरलेल्या अतिसक्षम पेशींचा थर असतो, व नारळांत जसे पाणी सांठते, तसेंच साधारणपणे दुग्धपेशीत दूध तयार होते. आतां दूध तयार होण्याची क्रिया काय काय आहे, त्यासंबंधी आपण थोडक्यांत व सोप्या रीतीने विचार करूं. वरील जे नारळाचे उदाहरण दिले ते फक्त त्या पेशींचे निरनिराळे मुख्य भाग किती असतात हे चांगले समजावे म्हणून दिले आहे. दुग्धपेशीतील सूक्ष्म रक्तवाहन्यांची आवरणे इतकी पातळ असतात की, त्यांतून पाण्यासारखे पातळ पदार्थ सहज पाझरतात. प्राण्यांच्या रक्तांत पुष्कळच पाणी व त्यांत विरलेले पदार्थ असतात व त्यांत काहीएक विशिष्ट प्रकारचे सूक्ष्म जंतूही वहात असतात. या सूक्ष्म जंतूंशिवाय जो रक्ताचा भाग (पाणी व त्यांत विरलेले पदार्थ मिळून ) असतो, त्यास शोणितद्राव म्हणतात. हा शोणितद्राव काहीएक विशिष्ट परिस्थिति असली म्हणजे रक्तवाहिन्यांतून दुग्धपेशीतील पोकळीत पाझरतो, व हाच शोणितद्राव दुधाचे उत्पत्तीस कारणीभूत होतो. - मागें प्राण्याने खाल्लेले अन्न रक्तांत कसे मिसळते व ते कोणत्या रूपांत असते, ह्यासंबंधी थोडक्यांत विचार केलेलाच आहे. त्यावरून प्राण्यांचे शरीरांत खेळणान्या रक्तामध्ये अन्नांत असलेले साखरेच्या जातीचे पदार्थ, शट पदार्थ, नायट्रोजनयुक्त पदार्थ व खनिजद्रव्ये ही कोणत्या तरी रूपांत अस. तात हे सिद्ध आहे. व असें रक्त दुग्धपेशीभोंवतीं पसरलेल्या रक्तवाहिन्यांतन वहात असते; तेव्हां अर्थातच त्यांत असलेले वरील पदार्थ थोड्या अधिक प्रमागांत ह्या पेशींत सांठणाऱ्या शोणितावाबरोबर येतात. ह्या द्रावाबरोबर नायट्रोजनयुक्त पदार्थ, खनिज द्रव्ये व थोडा ओशट भागही त्या दग्धपेशीत येतात. गाईने लसूण खाल्ली असतां दुसरे दिवशी दुधास लसणीसारखी घाण येते, हे बहुतेकांस माहीत आहेच. यावरून दुधाचा आणि शोणितद्रावाचा किती निकट संबंध आहे हे लक्षात येईल. असो. रक्तवाहिन्यांच्या आवरणांतन शोणिताव पाझरण्याच्या कियेस काहीएक विशिष्ट परिस्थिति असावी लागते. रक्तवाहिन्यांत वाजवीपेक्षा फाजील रक्त आल्याशिवाय-त्या तुडुंब भरल्याशिवाय त्यांचे आवरणांतून शोणितद्राव पाझरत नाही, व दुग्धपिंडांत आ