पान:दूध व दुभते.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ दूध व दुभतें. [प्रकरण च खोडसाळपणामुळेच त्या दूध देत नाहीत, अशी कल्पना आपण करतो. परंतु खरी स्थिती पाहिली असतां एक तर त्यांची दुग्धधारणाशक्ति कमी असते व दुसरे त्यांची आंचळे मांसल असल्या कारणाने दूध काढतांना मुठीत दाविली गेल्याने दुखतात व त्यांना त्रास होतो. ह्यास उदाहरण म्हटले म्हणजे लट्ट मनुष्याचे पोट चिमठीत धरले असता त्यास जसे वाटते, तसेच त्या गाईस होत असते. तेच सडपातळ मनुष्यास काही एक होत नाही. अस्सल दूध देणाऱ्या गाईचे कांसेमधून शेवटच्या थेंबापर्यंत सुद्धा तीस इजा न देतां दूध काढतां येते. असो. आतां आपण कांसेची अंतररचना कशी असते ते पाहूं. कांस ही कातडे. रक्तवाहिन्या, स्नायू, मज्जातंतू, चरबी, दूध वाहणाऱ्या नळ्या व वृद्ध उत्पन्न करणा-या पेशी मिळून झालेली असते. आंचळाच्या छिद्रापासून सुरुवात केली असतां, प्रथम या छिद्राभोवती एक वाटोळी स्नाय असते, व तिचे योगानें तें छिद्र बंद असते. परंतु ह्या स्नायूवर जनावराचा विशेष ताबा चालत नसल्यामुळे ह्या भोंकावाटे कासेंत दूध वाजवीपेक्षा जास्त झाले असल्यास ते आपोआप बाहेरे गळून जमीनीवर पडत असल्याची उदाहरणे पुष्कळदां पाहण्यांत येतात. आंचळांतील पोकळी आणि कांस ह्यांचा ज्या ठिकाणी संयोग झालेला असतो त्या ठिकाणी अरुंद झालेली असते. ह्या अरुंद भागाजवळील स्नायूवर जनावरांचा ताबा पुष्कळ असतो, व त्यांना ते भोंक बंद करितां येते. ह्या अरुंद भागाचे पुढे गेले असतां एक मोठी पोकळी लागते व ह्यांतच तयार झालेले दूध सांठून राहते. ह्या पोकळीत पुष्कळ दुग्ध यांची तोंडे आलेली असतात व त्यामधून पिंडाचे निरनिराळ्या भागांत यार झालेलें दध त्या पोकळीत येते. ह्या वाहिन्यापैकी एखादीचें निराळे निरीक्षण केले असता असे आढळून येते की, ज्याप्रमाणे लहान लहान ओहोळ मिळन एक आढा हाता, व अस पुष्कळसे ओढे मिळन एक ही माणच पाकळातन दूध आतणारा वाहिना पुष्कळच लहान नगर झालेली असते. ह्यापका अगदी लहान नळ्याचे शेवटीं दध उत्प " दुग्धपेशी" असतात. ह्या पेशींचा आकार फारच बारीक असतो. दग्धपेशीची संख्या गाईम्हशीचे सहावे वर्षापर्यंत सारखी वाढत असते व म्हणनच तिसन्या किंवा चवथ्या वेतापर्यंत गाईंचे दूध सारखे वाढत असते तन्हेची कांसेची मुख्य अंतररचना असल्यामुळे दूध वाहणाऱ्या नळ्या पिंडार ह्या भागांतून त्या भागांत आणि त्या भागांतून ह्या भागांत आलेल्या असतात. आणि त्यामुळेच एका आचळांतून दूध काढले असतां त्याच पिंडाचे दसरे भागांतलेही दूध आपोआप काढले जाते.