पान:दूध व दुभते.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वें]. दूध कसे तयार होते. प्रकरण ६ वें. दूध कसे तयार होते. सर्व सस्तन प्राण्यांचे शरीरांत उत्पन्न होणारा दूध हा एक रसच आहे. अशा प्राण्यांचे बाल्यावस्थेत त्यांचे पोषण करण्याकरितां ह्या रसाची योजना ईश्वराने केलेली आहे. प्रत्येक सस्तन प्राण्याचे शरीरांत दूध उत्पन्न करणारे दोनच पिंड असतात. कधी कधी एक एक पिंडाचे दोन अथवा आधिक भाग झालेले असतात व अशा प्रत्येक भागाला दूध बाहेर नेण्याकरितां एक एक नळी जोडलेली असते. यासच आपण "आंचळ " अथवा "सड" ह्मणत उदाहरणार्थ शेळीचे दुग्धपिंड विभागसेले नसतात, गाईम्हशींचे पिंडाचे साधा. रणतः दोन विभाग असतात. म्हणूनच एकंदर चार सड असतात व कत्रीचे किंवा मांजरीचे प्रत्येक पिंडाचे तीन अथवा अधिक भाग झालेले असतात पिंड प्राण्याचे पोटाकडील भागास शरीराच्या मध्यरेषेच्या बाजस एक उजवीकडे आणि एक डावीकडे असे असतात. नराचे शरीरांत असणान्या दुग्धपिंडाची वाढ होत नाही, कारण त्यांचे शरीरास गर्भधारणा करावयाची नसते वं अपत्यांचे पोषणही करावयाचे नसते. परंतु नरांचे दुग्धपिंडांतही पष्कळशा अस्वाभाविक कारणांनी दुधासारखा रस उत्पन्न झालेल्याची उदाहरणे आहेत. आपण गाईचे कांसेस हात लावून जरा दाबून पाहिले असतां आपणांस असे आढळून येईल की, आंत एक घट्ट गोळ्यासारखा भाग आहे व त्यास बाहेरून कातड्याचे आवरण आहे, व हा कठीण भाग गाईचे पोटास मजबन चिकटलेला आहे. आंचळे चाचपून पाहिली असता ती रबराचे नळीसारखी पोकळ आहेत असे आढळेल. चांगले पुष्कळ दूध देणाऱ्या गाईची कांसमोर काढण्याच्या पूर्वी लहानशा डेन्या एवढी मोठी दिसते, व आंचलेंडी धार योगाने तुडुंब फुगतात. कसिच्या बाहेरच्या आकारावरून तिची धारणा किती असेल, याची बरोबर कल्पना स्वतः आपले हातार्ने दूध काढल्याशिवाय करतां येणे कधीही शक्य नाही. कारण पुष्कळ जनावरांच्या कांसा मोठ्या दिसतात, परंतु त्या मांसल असल्यामुळे त्यांत पुष्कळ दूध मावत नाही. अशा कासेच्या गाईम्हशी पुष्कळ वेळां धार काढतांना लाथ मारतात, व धार कार्ड देत नाहीत व त्यांचे कांसेचे मोठ्या आकारावरून पुष्कळ दूध असावेसे वाटते