पान:दूध व दुभते.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण arriwarrrrrrrr रखें चालच असते. पुढे शिल्लक राहिलेल्याचे पचन पँक्रियारसाचे योगाने आंतड्यांत चालू राहते व असले पदार्थ वाजवीपेक्षां फार्जाल असले, तर गुदद्वारावाटे फाजील भाग बाहेर फेकला जातो. नायटोजनयुक्त पदार्थाचे पचन:-ह्या पदार्थांचे पचनास पहिल्याप्रथम रंवथ करणाऱ्या प्राण्यांचे चवथ्या पिशवीत सुरुवात होते. जठररसांत असल्या पदार्थांचे पचन करणारे एक तत्त्व असते. ह्या तत्त्वाचे योगाने असले पदार्थात रासायनिक फेरफार होऊन ते पाण्यात विरघळतात व त्यांचे शोषण होतें. शिल्लक उरलेले नायट्रोजनयुक्त पदार्थ आतड्यांत गेल्यावर पॅक्रिया रसाचे योगाने पचन पावतात व त्यांचे शोषणही आतड्यांतून होते. तेलाचे जातीच्या पदार्थांचे पचनः-चांगल्या चर्वणाने आणि नायटोजनयुक्त पदार्थीचे पचनाने अन्नांत असलेले ' ओशट पदार्थ" मोकळे होतात. व अन्न आंतड्यांत गेल्यावर पित्ताचे योगाने काही ओशट पदार्थाचा साबणासारखा पाण्यात विरघलणारा पदार्थ तयार होतो, व त्याचे योगाने उरलेल्या तेलाचे अतिसूक्ष्म बिंदु होऊन ते इतर विरघळलेल्या पदार्थाबरोबर मिसळतात व त्यांचे शोषण होते. निरिद्रिय पदार्थाचे पचना-या पदार्थांचे पचन जठररसासारख्या पदाथात जी आम्ले असतात व अन्नाच्या पचनक्रियेत जी इतर आम्लें तयार होतात त्यांचे योगाने होते. ह्या सर्व पदार्थांचे शोषण अतिसूक्ष्म नळ्यांचे योगाने होते व ते शोजित अन्न काही विविक्षित अशुद्ध रक्तवाहिन्यांत जातें व अशुद्ध रक्ताबरोबर मिसळते. असें मिश्रण काळजांतून फुप्फुसांत जाते व तेथे त्याचे शद्धीकरण होऊन पुन्हा ते काळजाचे दुसरे भागांत जातें, व तेथून ते अन्न शद्ध रक्ताबरोबर सर्व शरीरभर पसरते. जेथे जेथे नवीन भाग तयार होत असतील किंवा नवीन पिंडरस उत्पन्न होत असतील, तेथे तेथे अशा शोषिलेल्या पदाथांचा नवीन घडामोडीस पुरवठा होतो. अशा प्रकारच्या अन्नमिश्रित शुद्धरक्ताचा पुरवठा करणा-या रक्तवाहिन्या सर्व शरीरभर पसरलेल्या असतात. ह्यापैकी एक मोठी वाहिनी मत्र-पिंडाकडे आणि तिची एक शाखा दुग्धपिंडाकडे (कांसेकडे) गेलेली असते, व तिच्यापासूनच कांसेस शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. अशा तन्हेने थोडक्यांत अन्न तोंडांत गेल्यापासून त्याचे पुढे काय काय होते आणि ज्या भागांत दूध तयार होते तेथे ते कोणत्यारूपांत असते, ह्याचा येथवर विचार झाला. आतां दूध कोठे व कसे तयार होते ते पुढील प्रकरणी पाहूं.