पान:दूध व दुभते.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें]. गुरांचे चाऱ्याची घटकद्रव्ये आणि त्यांचे पचन. २९ wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww मार्ग आक्रमावा लागतो हे समजणे फार आवश्यक आहे. गाई-म्हशींसारख्या जनावरांस अन्न तोंडात घेण्यास जिभेची आणि ओठांची मदत लागते. अन्न तोंडांत आल्यावर दाढा, जीभ आणि गालफडे यांचे योगानें अन्नाचे चांगले चर्वण होतें. जसे जसें चर्वण चालतें तसे तसे तोंडांत लाळ सुटण्यास प्रारंभ होऊन ती लाळ अन्नाबरोबर मिसळत जाते. अशा रीतीने अन्नाचे बारीक कण होऊन लाळेचे योगानें तें अन्न मऊ होऊन त्याचे लहान लहान गोळे बनत जातात, आणि ते घशावाटे पोटांत फेकले जातात. गाई-म्हशींसारख्या रंवथ करणा-या प्राण्यांचे पोट इतर प्राण्यांच्या पोटासारखें साधे नसते. त्यास चार पिशव्या असतात, यापैकी पहिली पिशवी सर्वांत मोठी असून चवथी सर्वात लहान असते. पहिल्या पिशवीत अन्न आल्यावर तेथें तें कांही वेळ तसेंच राहते, व जनावरांच्या इच्छेप्रमाणे दुसऱ्या पिशवीतून पुन्हां तोडांत रंवथ करण्याकरितां येतें व स्वस्थपणाने चांगले चावून झाल्यावर तिसऱ्या पिशवीत जातें, कधी कधी ते पहिल्याही पिशवीत जाते. तिसऱ्या पिशवींतन चवथींत जाते, ह्या पिशवीचे आतील बाजूस जी कातडी असते, तिच्यापासन एकप्रकारचा रस पाझरत असतो (त्यास जठररल म्हणतात ) त्यांत ते अन्न मिसळते. तेथून ते अन्न पुढे आंतड्यांत फेंकले जाते. आंतड्यांत शिरल्यावर त्यांत " पित्त ' व 'पक्रियारल' मिसळतात. __ ह्या वर सांगितलेल्या सर्व रसांचे योगानें अन्नाचे पचन एकसारखे चाल राहन पचन झालेल्या अन्नाचे शोषणही सारखें चालू राहते, पचन झालेल्या पदार्थांचे शोषण झाल्यावर जो गाळ बाकी राहतो, तो गुदद्वाराकडे जमत जातो व पुरेसा जमल्यावर बाहेर फेकला जातो. ह्याप्रमाणे अन्नास मार्ग आकमावा लागतो. आतां गुरांचे चान्याची जी मागें घटकद्रव्ये सांगितली, त्यांचे प्रत्येकाचे पचन स्वतंत्र रीतीने कसे कसे होते ते पाहूं. साखरेच्या जातीच्या पदार्थाचे पचनः-ह्या जातीच्या पदार्थाचे प. चन तें तोंडांत आल्याबरोबर सुरू होते. मागें सांगितल्याप्रमाणे तोंडांत भन्न पडल्याबरोबर लाळ सुटण्यास आरंभ होतो व ती अन्नाबरोबर मिसळते. या लाळेत साखरेच्या जातीच्या पदार्थाचे पचन करणारे एक तत्त्व असते. या योगाने "पिटळ सत्त्वा" सारख्या पदार्थाची पाण्यात विरघळणारी साखर तयार होते. ह्यास आपले प्रचारांतील दृष्टांत म्हटला म्हणजे कोरडे पोहे नसते खाणे हा होय. पोहे जसजसे अधिक चावले जातात व त्याबरोबर शोधक लाळ मिसळते, तसतसे ते अधिक गोड लागतात असे प्रत्येकाचे अनभवास आलेले असेलच. अशा रीतीने. अर्धवट पचनाच्या स्थितीतच असले पदार्थ पोटांत फेकले जातात. तेथेही त्यांचे पचन, विरघळणे आणि शोषण एकसा