पान:दूध व दुभते.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ दूध व दुभते. [प्रकरण उष्णता कायम राखण्यास उपयोगी पडतो. थंडीचे दिवसांत धंधरमासाचे निमित्ताने तुपा-लोण्यावर सडकून ताव मारण्याची जी वहिवाट आहे, तिच्या बुडाशी हेच कारण आहे. नायट्रोजनयुक्त पदार्थ:-प्राणी व वनस्पति यांचे शरीराची रासायनिकदृष्टया तुलना केली असता असे आढळून येते की, वनस्पतींचे शरीरांत साखरेच्या जातीच्या द्रव्यांचे प्रमाण जास्त व प्राण्यांचे शरीरांत नायट्रोजनयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असते. म्हणून वनस्पतींना कार्वनचे जास्त शोषण करावे लागते. तसेच प्राण्यांचे शरीराचे कोणत्याही भागाची रचना करावयाची असल्यास नायट्रोजनयुक्त पदार्थाची फारच गरज लागते. यावरून चान्यांतील नायट्रोजनयुक्त पदार्थी किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. गुरांचे चाऱ्याची विशेषतः कसदार चा-याची किंमत व पोष्टिकपणा त्यांत असलेल्या नायट्रोजनयुक्त पदार्थांचे प्रमाणावर अवलंबून असतो. ह्या पदार्थापासून शरीरांतील पेशी समुचय वाढतो, केस-लोकर वाढण्यास मदत होते, गर्भाची वाढ होण्यास लागणाऱ्या द्रव्यांचा विपुल पुरवठा होतो व शरीरांतील अनेक पिंडरस उत्पन्न होण्यास मदत होते. अशा पिंडरसापैकी प्रस्तुतचा विषय " दूध " हा एक रस मुख्य आहे. दुधात असलेले "ओशटबिंदु" व शरीरांत असलेल्या चरबीचा मोठासा भाग तयार होण्यास नायट्रोजनयुक्त पदार्थच कारणीभूत होतात, हे या विवेचनावरून उघड दिसणार आहे. निरिद्रिय द्रव्यः-ह्यांचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे प्राण्याचे शरीरांत जो हाडांचा सांपळा असतो तो तयार करण्याकडेच होतो. हाडांमध्ये मुख्यत्वे. करून चुना व फास्फरसचे आम्ल मिळून जो एक क्षार तयार होतो त्याचेच प्रमाण जास्त असते. ज्या प्राण्यांचे चान्यांत ह्या क्षाराचे प्रमाण पाहिजे तितकें असते त्यांची हाडे फार बळकट असतात; परंतु ज्यांना हा क्षार भरपूर मिळत नाही, त्यांचा सांपळा अगदी कमजोर व लवचिक असतो. शिवाय शरीरांत उत्पन्न होणारे अनेक पिंडरस तयार होण्यास निरिंद्रिय क्षार अवश्य लागतात, उदारणार्थ अन्नाशयांतील रस तयार होण्यास मिठाची जरूरी लागते. कारण मीठ व मिठाचे आम्ल (IICL) हे त्या रसाचे मुख्य भाग आहेत आणि यांचा थोडासा कमीपणा झाल्यास चान्याचे पचन चांगले होत नाही. अशा रीतीने चान्यांतील घटक द्रव्यांची कार्ये काय काय आहेत हे थोडक्यांत पाहिल्यावर त्यांचे पचन कसकसे होते हे पाहूं. अन्नपचन. अन्नाचे पचन कसे होते, कोणकोणत्या पदार्थीवर कोणकोणत्या रसाचा परिणाम होतो, हे नीटपणे समजण्यास प्राणी जे अन्न खातो त्यास कोणता