पान:दूध व दुभते.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें]. गुरांचे चाऱ्याची घटकद्रव्ये आणि त्यांचे पचन. २७ साखरेच्या व तेलाच्या जातीचे पदार्थ. असल्या पदार्थाचें मुख्य काम म्हटलें म्हणजे शरीराची उष्णता कायम राखणे व काम करण्याची शक्ति पुरविणे हे होय. व्यवहारांत साधारणपणे तीन प्रकारांनी उष्णता उत्पन्न होते. (१) निरिंद्रिय पदार्थात होणान्या रासायनिक घडामोडीमुळे ह्यांतच विद्युच्छक्ति व तीपासून उत्पन्न होणारी उष्णता यांचा समावेश होतो. (२) घर्षण होत असतांना लावलेल्या शक्तीच्या रूपांतरामुळे व ( ३ ) सेंद्रिय पदार्थात असलेल्या कार्यन वगैरे मूलतत्वाशी प्राणवायूच्या संयोगामुळे. तिस-या प्रकारचाच प्राण्याच्या जीवनकलहाशी मुख्यत्वेकरून संबंध अस. ल्यामळे त्याविषयींच आपण विचार करूं. प्राणवायूचा सेंद्रियपदार्थाशी संयोग तीन रीतींनी घडून येतो. (क) प्रत्यक्ष संयोगः-चुलीत लांकडे जळतात तेव्हा त्यापासून जाळ उत्पन्न होतो, लांकडाचे निखारे होतात व त्यांची कालांतराने पांढरी स्वच्छ राख होते आणि तेज व उष्णता एकदम नाहीशी होतात. म्हणजे राखेत असलेल्या पदार्थाशिवाय लांकडांत असणान्या इतर पदार्थाशी प्राणवायूचा संयोग होतो व ते वायुरूपाने वातावरणांत नाहीसे होतात, (ख) अतिसूक्ष्म जंतूचे सहवासाने होणारा अप्रत्यक्ष संयोगःयाचे उदाहरण म्हणजे कोणत्याही सेंद्रिय पदार्थांचे फसफसणे किंवा आंबणे होय. भिजविलेली कणीक रात्रभर जर ठविली तर ती फसफसून फगते व थोडी गरमही झालेली आढळते. कणीक भिजवून ठेविली म्हणजे तीत लाखों अतिसूक्ष्म जंतु उत्पन्न होतात. ह्या जंतूंचे साहय्याने प्राणवाय कणकेंत असलेल्या काबन तत्त्वाशी संयोग पावतो व त्यामुळे कणकेंत ज्यास्त गरमपणा येतो, व या संयोगामुळे कार्यनचा जो वायु तयार होतो, त्याचे योगाने ती कणीक फुगते, (ग) जिवंत प्राण्याचे श्वासोछ्वासामुळे रक्तातील द्रव्यांशी संयोग. प्राणी जे अन्न खातो त्याचे पचन होऊन ते रक्ताबरोबर मिसळते व ते रक्त फुफ्फुसांत येते, व तेथें श्वासोछ्वासाबरोबर येणा-या प्राणवायूशी संयोग होऊन उष्णता उत्पन्न होते. चुलीत ज्याप्रमाणे लांकडे त्याचप्रमाणे शरीरांत उष्णता कायम राखण्यास साखरेच्या व तेलाच्या जातीचे पदार्थ कारणीभूत होतात. या प्रकारच्या चान्यांतील द्रव्यापासून प्राण्याच्या शरीरांत चरबीचा काही संचय होतो व हाच संचय एखादे वेळी अन्न न मिळाल्यास शरीराची