पान:दूध व दुभते.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण (१) प्राण्यांचे शरीरांत जे काही निरनिराळ्या प्रकारचे व्यापार चाल असतात व हरएक प्रकारच्या घडामोडी घडून येतात, त्या सर्व शरीरघटक अति सूक्ष्म-पेशीमध्ये असणाऱ्या सजीव तत्वावरच अवलंबून असतात. ह्या सजीवतत्त्वास जर पाहिजे तितकें पाणी मिळाले नाही, तर त्याची सर्व चेतनाशक्ति नाहीशी होते व सर्वं व्यापार बंद होतात. (२) पाण्याचे साहाय्याने शरीरांतील स्नायूसारख्या पेशीसमच्चयांस लवचीकपणा येतो व चा लवचीकपणानेच प्राण्यांच्या सर्व हालचाली शक्य होतात, (३) पाण्यामुळेच रक्ताचा पातळपणा कायम राहतो. शरीरातील रक्तवाहिन्या इतक्या सूक्ष्म असतात की, त्यांपैकी लाखों आपल्यास नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत; परंतु त्यांतूनही रक्ताचा एकसारखा प्रवाह चालू असतोच. हा प्रवाह रक्तांत काहीएक विशिष्ट प्रमाणांत पाणी असल्याशिवाय चालू राहणे शक्य नाही. रक्त थोडे बाहेर हवेत पडले की तें लागलीच घट्ट होते. प्राणी शरीरांतून श्वासोच्वासाबरोबर पाण्याची वाफ एकसारखी बाहेर टाकीत असतो व हवा आंत घेत असतो. तसेंच कातडीतून व मलमूत्राबरोबर कितीतरी पाणी शरीरांतून बाहेर जात असते. तेव्हां प्राण्यांचे शरीरांत जर पाण्याचा सांठा नसता तर रक्त तेव्हांच गोठून गेले असते, रक्तवाहिन्यांतून रक्त प्रवाह बंद झाला असता व सर्व व्यापार थंडावले असते. ह्या सर्व अडचणी चान्यांत असलेल्या किंवा पिण्यांत जाणान्या पाण्यानेच नाहीशा होतात. (४) पाण्याचे योगाने चारा भिजून मऊ होतो व त्यांतील पोषक द्रव्ये जठररसाचे योगानें रूपांतर पावून पाण्यात विरघळतात व नंतर त्या द्रव्यांचे शोषण व सर्व शरीरभर अभिसरण शक्य होते. (५) शरीरांतील व्यापार चालू ठेवण्यास ज्या ज्या पिंडरसांची अवश्यकता असते ते ते पिंडरस पाण्याशिवाय उत्पन्न होणे व त्यांत पाण्याचे विशिष्ट प्रमाण राहणे शक्य नाही. उदाहरणार्थ आपण लाळ घेऊ. लाळ जर उत्पन्न झाली नाही किंवा तिजमध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले तर चारा गिळणे अगदी अशक्य होईल. (E) सर्व शरीर साफ ठेवणे हे एक मोठे काम पाण्याचेच योगानें होतें. निरनिराळ्या प्रकारची, निरुपयोगी व दूषित द्रव्ये काही मूत्रावाटे शरीराचे बाहेर फेकली जातात, काही घामावाटे निघून जातात व कांहीं श्वासोछवासाबरोबर जी वाफ जाते तीबरोबर बाहेर पडतात.