पान:दूध व दुभते.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें]. गुरांचे चाऱ्याची घटकद्रव्ये आणि त्यांचे पचन. २५ संलग्न होऊन त्यापासून निरनिराळी द्रव्ये बनतात. अशा द्रव्यांचे निरनिराळे गुणधर्म नुसत्या रासायनिक परीक्षेनेच कळून येतात असें नाहीं; तर आपले इंद्रियांचे योगाने ही बरेचसे समजतात. उदाहरणार्थ आपण उसांतील साखर, तांदुळांतील " पिठूळ सत्त्व " व जोंधळ्याचे कडब्यांतील भेंड "पेशीवेष्ठन द्रव्य" ही घेऊ. ह्या तीनही पदार्थातील मूलतत्त्वे एकच आहेत. परंतु त्यांचे प्रमाण व त्यांचा परस्पर संबंध ही अगदी भिन्न असल्यामुळे त्यांचे गुणधर्मही निराळे झाले आहेत. साखर तेव्हांच तोंडांत विरघळते व गोड लागते, सत्त्व एकदम न विरघळतां चावतां चावतां लाळेशी मिसळत गोड होत जाते व यापैकी कोणताही प्रकार भेंडांत होत नाही. असो. अशा प्रकारच्या सूक्ष्म निरीक्षणाने शोधून काढलेली चान्यांतील मुख्य द्रव्ये खाली दिल्याप्रमाणे आहेत: चारा. पाणी. १ पाणी ... ... .. ... पाणी. शुष्कपदार्थ. २ साखरेचे जातीचे पदार्थ साखर, सत्त्व, पेशीघाटक द्रव्य, तंतमयभाग, , काष्ठमय भाग वगैरे. निरनिराळ्या प्रकारचे तेलाचे जातीचे व ३. तेलाचे जातीचे पदार्थ मेणासारखे ओशट पदार्थ. ४ नायट्रोजन युक्त पदार्थ ] कणकेंतील चिकांचे जातीचे पदार्थ. ५ निरिंद्रिय क्षार । चुना, सोडा, पोट्याश वगैरेंचे निरनिराळ्या Sआम्लाशी मिळून झालेले क्षार, ही जनावरांचे चान्यांत नेहमी थोडीतरी ६ रेती, माती वगैरे कोणत्याना कोणत्यातरी रीतीने येतेच. चान्यांतील निरनिराळ्या घटक द्रव्यांची कार्ये. पाणी:-गुरांचे खाण्याचे पदार्थात पाणी निरनिराळ्या प्रमाणांत असते. ओल्या चान्यांत तर कधी कधी शेकडा ९० टक्के सुद्धा असते. पाणी पेय या नात्याने किंवा चान्याचे एक घटक द्रव्याचे रूपाने जनावरांचे पोटांत जाते. पाण्यास जनावरांचे शरीरांत फारच महत्त्वाची कार्य करावयाची असतात, ती लक्षात घेतली असतां शरीरांत जाणान्या पाण्याचे शुद्धतेविषयी खबरदारी किती घेतली पाहिजे हे तेव्हांच समजेल.