पान:दूध व दुभते.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ दूध व दुभते. [प्रकरण - - प्रकरण ५ वें. गुरांचे चाऱ्याची घटकद्रव्ये आणि त्यांचे पचन. मागें गरीच्या चान्यापाण्याविषयी स्थूलदृष्टीने विचार झालेलाच आहे. परंतु त्याविषयी सूक्ष्मदृष्टीने विचार केल्याशिवाय चारापाण्याचे खरे महत्त्व कधीही नीट लक्षात येणार नाही, व काटकसरीने त्याचा उपयोगही करून घेतां येणार नाही. याकरितां चा-याची घटकद्रव्ये काय काय असतात, त्यांचे पचन कले कसे होत असते व त्यानां प्राण्याच्या जीवनक्रमांत काय काय कार्य करावयाची असतात, याविषयी थोडक्यांत विचार करावयाचा आहे. शिवाय या गोष्टी कळल्यावर दुधाची उत्पत्ती कशी होते, हे कळण्यास फारसा त्रास होणार नाही. चाऱ्याची घटक द्रव्ये. मुख्यत्वेकरून गुरांचा चारा काही प्रकारच्या ओल्या किंवा वाळलेल्या उतिज्ज्यांचा किंवा त्यांच्या काही विशिष्टभागांचा झालेला असतो. उदाहरणा आपण गव्हांची ओली ओंबी घेऊ या. ह्या ओल्या ओंबीचा तोडलेला ना दाबन पाहिला तर त्यांतून पाणी बाहेर येतांना दिसते व नंतर ती ओलीको चांगल्या उन्हांत वाळविली तर ती सुकून जाते, व वजनांतही कमी भार म्हणजे उन्हाचे तापाने ओंबातील पाणी वाफ होऊन नाहीसे होते. यावरून ती ओंबी दोन पदार्थाची झालेली आहे हे सिद्ध होते (१) पाणी आणि (२) सके पदार्थ. त्या वाळलेल्या ओंबीचे जर दोन भाग केले आणि त्यापैकी एक जाळन पाहिला, तर त्याची पांढरी स्वच्छ राख शिल्लक राहते व ती वजनांत किती तरी पटीने कमी भरते. यावरून गव्हाचे ओंबीत कांहीं " दाह्य " व कांही " अनाद्य पदार्थ आहेत हे व्यक्त होते, शिल्लक उरलेल्या ओंबीचे भागांतील गव्हाचे वाळलेले दाणे काढून त्याचे पीठ करावें व ते एका फडक्यांत बांधन एका भांड्यांत पाणी घेऊन ती परचुंडी हळूहळू कुसकरल्यास पाण्याचे बडाशी पिठासारखा साखा ( पिठूळ सत्त्व ) बसलेला दिसतो व फडक्यांत चिकट पदार्थ (चीक ) उरलेला दिसतो. ह्यावरून गव्हाची कणीक सुद्धा वरील दोन पदार्थाची मख्यत्वेकरून झालेली आहे, हे उघड आहे. रासायनिक पृथक्करण करून पाहिलें असतांही असे आढळन येते की, ही ओली ओंबी पुष्कळ मूलतत्त्वांची बनलेली आहे. ही मूलतत्त्वे एकमेकांशी रासायनिक नियमानुरूप निरनिराळ्या प्रमाणांत