पान:दूध व दुभते.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ थे ]. जनावरांची कसदार खायें. २३ ती भिजवून किंवा शिजवून द्यावी. सरकी दिल्याने दूध चांगले कसदार होते. सरकी दिल्याने लोण्याचे प्रमाण वाढून त्याचा घट्टपणाही वाढतो. हरभऱ्याची, तुरीची वगैरे डाळ केल्यावर जी चुरी उरते ती दुभत्या जनावरांस फार चांगली. ती सुद्धा थोडी भिजवून दिल्यास फार चांगले, चुरीच्या शुद्धतेविषयी जास्त काळजी घेतली पाहिजे. तीत माती, वाळू, सुया, टांचण्या वगैरे जिन्नस जाण्याचा फारच संभव असतो, तुरीच्या कोंड्याने दुधाचे प्रमाण वाढते, व गाईचे दुधास जास्त पिवळसर रंग येतो. म्हशीपेक्षां गाईस तो देण्याची जास्त बहिवाट आहे. कारण म्हशीस देऊन त्याचा फायदा तितका दिसून येत नाही. तांदुळाचा कोंडा (वरची टरफले नव्हे) सुद्धां चांगला असतो. त्याच्या तेलकटपणामुळे तो गुरांस फार आवडतो. गव्हांचा कोंडा फारच पौष्टिक असतो. तो भिजवून किंवा शिजवून, मीठ किंवा गूळ घालून देतात. गव्हांच्या कोंड्याने मलावरोध होत नाही व कोठा साफ राहतो. गाभण गाईस विण्याचे पूर्वी १५।२० दिवस देत गेल्यास गाईस विण्याचे वेळी इतका त्रास होत नाही. । आंबोण तयार करतांना त्यांत मीठ घालण्यास कधीही विसरूं नये, प्रत्येक मोठ्या जनावरास दोन छटाक मीठ प्रत्येक दिवशी द्यावे. मिठापासून अनेक फायदे होतात, ते असे: १ आंबोण जास्त रुचकर होतें. २ लाळ पुष्कळ सुटल्याने चान्याबरोबर ती चांगली मिसळते व पचन चांगले होते, ३ मिठापासून जठररसाच्या एका मुख्य द्रव्याचा पुरवठा होतो. ४ मिठापासून पोटांत कमि होण्याचा संभव कमी असतो. ५ मिठाने शुद्ध रक्ताचा पुरवठा जास्त होतो. मिठाने जनावरें पुष्कळ पाणी पितात. व त्यामुळे त्यांचे दूध थोडे तरी वाढतें, पुष्कळ ठिकाणी आंबोणांत मीठ न घालता गोठ्यांचे आवारांत किंवा गवाणीचे जवळ लाहोरी मिठाचे मोठे मोठे खडे ठेवितात. असे केल्याने जनावरें वाटेल त्यावेळी हे खडे चाटीत बसतात, व त्यांस हवे तेवढे मीठ मिळतें.