पान:दूध व दुभते.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ दूध व दुभते. [प्रकरण दुधाचे प्रमाण कमी होऊन अंगांतील चरबी मात्र वाढते, व त्यामुळे गुरे ल दिखू लागतात. करडईची पेड:-ही पेंड बरीच स्वस्त असते. टरफलें काढलेल्या करडईची पेंड बरीच पौष्टिक असते. टरफलांचे प्रमाण जास्त असल्यास ती पेंड गुरांस देण्यास वाईट. कारण ती टरफले कोठ्यास लागण्याचा संभव असतो. ज्या पेंडींत भुइमुगाची मिसळ असते ती साध्या पेंडीपेक्षा जास्त पौष्टिक असते. ही पेंड बरेच दिवस चांगल्या स्थितीत राहते. भुइमुगाच्या मिसळीने ती लवकर सट होते. कारळ्याची पेंडही अशाच प्रकारची असते, व ती करडईपेक्षाही स्वस्त असते. ५मोहरी व शिरलाची पेंडः-या पेंडीत कातडीची आग करून उतणारे तत्त्व असते, म्हणून हिचा उपयोग कोरड्या स्थितीत करूं नये. ही पेंड जनावरांस देण्यापूर्वी हवेचे उष्णतेच्या मानाने कमी किंवा अधिक तास पाण्यात भिजत ठेवावी. उन्हाळ्याचे दिवसांत चार-पांच तास थंडीचे दिवसांत आठ-नऊ तास ठेवल्यास ती चांगली तयार होते. असे केल्याने फसफसण्याच्या क्रियेमुळे तीत रासायनिक फेरफार होऊन तिचा वाईट परिणाम होत नाही. तीस जास्त गोडी येते, मऊ होते व उग्र वास नाहीसा झाल्याने दुधासही वाईट उग्र वास येत नाही. ही पेंड उष्ण असते ती थंडीचे दिवसांत देण्यास चांगली. बजयाची पंडा-ही सुद्धा चांगली पौष्टिक असते, परंतु सर्व ठिकाणी मिळत नाही; महाग असते व लवकर बिपडते. - धान्ये, कडधान्ये, चुरी वगैरे ___मार्ग सांगितल्याप्रमाणे कडबा, भूस यांचे मानाने धान्यांत पौष्टिक द्रव्ये जास्त असतात म्हणून ती जास्त गोडही असतात, त्यामुळे जनावरें आधाशी. पणाने खातात. परंतु ती चांगली चावलीं न गेल्यामुळे शेणामधून ती जशीच्या तशी पडतात व त्यांचा दुरुपयोग होतो. धान्याचा दाणा द्यावयाचा असल्यास तें धान्य अर्धे भरडावें व थोडेसें भिजवून नंतर यावे, किंवा ते चांगले भिजवन किंवा शिजवन द्यावे. असे केल्याने ते मऊ होते व चांगलें चावलें जाऊन त्याचे पचनही उत्तम होते, व विनाकारण नासाडी होत नाही. अशा धान्यांपैकी बाजरी, हरभरा, हुलगे, मटकी वगैरे मुख्य आहेत यांपैकी बाजरी उष्ण आहे. गाय अगर नेस व्याल्यावर बाजरी भरडून, शिजवून, गूळ घालून खिचडी करून देण्याची वहिवाट आहे. ह्या बाजरीच्या खिचडीने विण्याचे श्रमापासून आलेला थकवा जातो व जनावरांस ताकद येते. हरभरे, मटकी, हुलगे वगैरे भरडून भिजवून द्यावेत. सरकी मुद्धां फारच पौष्टिक आहे.