पान:दूध व दुभते.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ थे ]. जनावरांची कसदार खायें. ती विनइन किंवा अळशी सरकीसारखी गळितांची धान्ये हीच मुख्य आहेत. यांपैकी पुष्कळसे पदार्थ मनुष्याचे उदरनिर्वाहास अत्यंत उपयोगी आहेत, यामुळे त्यांचा उपयोग जनावरांस देण्याकडे करणे रास्त होत नाही, म्हणून काही हलक्या प्रतीची धान्ये, चांगल्या धान्याचा कोंडा व तेल काढून घेऊन राहिलेली पेंड हीच गुरांस देण्यांत येतात; पैकी पेंड हीच सर्वात ज्यास्त पौष्टिक आहे. पेड:-जनावरांस जी पेंड द्यावयाची असेल ती चांगली स्वच्छ बुरा न आलेली असावी. ताजी पेंड असल्यास फारच उत्तम. काही प्रकारच्या पेंडीचा लवकर उपयोग न केल्यास त्या खवट होतात, बुरशी वाढते व लवकर किडतात. अशा प्रकारची पेंड जनावरांस कधीही देऊ नये. पुष्कळ वेळ एकदम पेंड फोडून ठेविल्यास त्यांत चुका, कांचेचे तुकडे वगैरे जिन्नस जाण्याचा संभव विशेष असतो. पेंडीचे कुन्हाडीने बारीक तुकडे करण्यापेक्षा ठेचून बारीक तुकडे करणे चांगले. कारण पेंड ठेचली गेल्याने ती मऊ होते व अणकुचीदार टोकें व तीक्ष्ण कोरा राहत नाहीत. पेंडीचा उपयोग करण्यापूर्वी त्या पेंडीचे गुणधर्म व त्यापासून होणारे फायदे लक्षात घेऊन जनावरांच्या परिस्थितीप्रमाणे ती द्यावी. नुकत्याच फळलेल्या गाईस जर उष्ण पॅड दिली तर ती उलटण्याचा संभव असतो. जनावरांस दिल्या जाणान्या काही पेंडीचे गुण-धर्म खाली दिल्याप्रमाणे आहेत. १. भुइमुगाची पेड:-ही पेंड फारच पौष्टिक आहे व तिला किंमतही जास्त पडते. निखालस भुइमुगाची पेंड बहुतेक मिळत नाही. कारण करडई, कारळे, तीळ वगैरे भुइमुगाशी मिसळून तेल काढण्याची पुष्कळ ठिकाणी वहि. वाट असते. ह्या पेंडीचा उपयोग काटकसरीने करावा. दुभत्या गाईस व वाढत्या वांसरांस ती फारच उपयोगी असते. ही पेंड फार दिवस चांगल्या स्थितीत रहात नाही, म्हणून हिची खरेदी एकदम करूं नये. २. तिळाची पेड.-ही पेंडही पौष्टिक आहे, परंतु जास्त उष्ण आहे. थंडीचे दिवसांत उपयोग केल्यास चांगले. गाईपेक्षां म्हशीस ही पेंड चांगली मानवते. ही पेंड लवकर खवट होत नाही. ३. जवसाची पेंड-ही पेंड ही फार पौष्टिक आहे व थंडही आहे. वाढत्या वांसरांस देण्यास फार चांगली असते. दुधामध्ये जी द्रव्ये असतात त्याच जातीची द्रव्ये साधारणपणे त्याच प्रमाणांत असतात. ही पेंड औषधाप्रमाणे मधून मधून दिल्यास जनावरांचा कोठा साफ राहतो. कारण जवसाचा सौम्य रेचकाप्रमाणे उपयोग होतो. ही पेंड दुभत्या जनावरांस नेहमी देत गेल्यास