पान:दूध व दुभते.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[प्रकरण दूध व दुभते. प्रकरण ४ थ. .. याम ग र जनावरांची कसदार खायें. कसदार खायेः-खरोखर पाहिले तर गाई-म्हशींचे नैसर्गिक भक्ष्य म्हणजे गवतच होय. परंतु ही गोष्ट लक्ष्यांत घेतल्यास असा प्रश्न उत्पन्न होतो की, असे जर आहे तर जनावरांस गवताशिवाय दाणा, पेंड देण्याचे प्रयोजन तें कोणतें ? परंतु एकंदर परिस्थितीकडे थोडेसें बारकाईने पाहिले असतां वरील प्रश्नास उत्तर तेव्हांच मिळते. मनुष्यप्राणी दिवसेंदिवस ज्यास्त सुधारत चालला आहे, व त्याबरोबरच त्याचा आप्पलपोटेपणा व ऐषआराम हे सुद्धा वाढत चालले आहेत. त्यामुळे स्वजातिव्यतिरिक्त प्राण्यांवर त्याने आपल्या सर्व सुखाचा भार ठेविला आहे, म्हणून त्यांचेकडून जितकें काम करून घेणे शक्य असेल तितकें तो घेत असतो. यामुळे जनावरांच्या परिस्थितीतही पुष्कळच फरक पडत चालला आहे. रानटी स्थितीतल्या गाई आणि पाळलेल्या दुभत्या गाई यांची तुलना केली असतां, किंवा आपल्या महाराष्ट्रांतील दुभत्या गाई व इंग्लंड, अमेरिकासारख्या सुधारलेल्या देशांतील सुधारलेल्या गाईची परिस्थिति इतकी बदलली आहे की, त्यांस दूध उत्पन्न करणारी यंत्रेच म्हटल्याशिवाय राहवत नाही. एकीकडून कृत्रिम अन्ने चारावीत व दुसरीकडून वाफेच्या योगाने चालणा-या पंपानें दूध काढून घ्यावें. अशी जेथे परिस्थिति बदलते, तेथें नुसत्या गवतासारख्या नैसर्गिक अन्नाने काय होणार आहे ? गवत, कडबा किंवा भूस यापेक्षां धान्ये, कडधान्ये हीच जास्त कसदार असतात. प्रत्येक झाडाचें काम इतर सर्व सजीव वस्तूप्रमाणे आपले स्वतःचे शरिराची वृद्धि करून आपली वैशपरंपरा राखणे हे आहे व हे काम त्यांचे बीजांकडून होते. म्हणून झाडांत तयार झालेल्या अस्सल द्रव्यांचा साठा इतर भागांचे मानाने बीजांतच जास्त असतो. ही द्रव्ये बीजांत असलेली तेलें, साखर, पिठूळ सत्व, नायट्रोजनयुक्त पदार्थ व निरिद्रिय क्षार वगैरे होत. ही द्रव्ये जनावरांस व मनुष्यांस सारखीच उपयोगी आहेत, व मनुष्यांस मुख्यत: धान्यावर रहावे लागल्यामुळे ती मनुष्याचे अन्न या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहेत म्हणून ती गुरांस देण्यास परवडत नाहीत. जनावरांस दिल्या जाणान्या कसदार खायांपैकी बाजरी, जोंधळा, मका ही धान्ये, हरभरा, तूर, मटकी,