पान:दूध व दुभते.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जनावरांची जोपासना. १९ www.www.www.wwwxxxwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww~ जनावरांची चाकरी:-दुभत्या जनावरांची चाकरी केल्यास फार फायदा होतो. अगदी घोड्याप्रमाणेच जरी चाकरी केली नाही, तरी त्यांचे अंग धुवून नेहमी साफ ठेवावे. रुमालाने त्यांचे अंग रोजचे रोज चोळून पुसावे ह्मणजे मळ निघून तें साफ राहते, केस तुळतुळित राहतात व नाना प्रकारच्या कातडीच्या रोगांची भीति उरत नाही. याशिवाय गोमाशा, गोचड्या, पिसा वगैरेसारख्या त्रासदायक प्राण्यांपासून जनावरांचा बचाव होतो. जेथें नदी असून पोहण्याची सोय असेल, तेथें जनावरांस पोहण्यास न्यावे. अशाने त्यांचे अंग साफ होऊन त्यांचे स्नायू मोकळे होतात. गाईच्यापेक्षा मशींच्या धुण्याची जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यांना दररोज नाहीं तर एक दिवसाआड तरी धुतलेच पाहिजे; कारण एक तर हँस हा घाणेरडा प्राणी व दुसरें स्वाभाविक पाण्यांत राहणारा. मशीना रोजचेरोज जर चांगले धुतले नाही, तर त्यांचे अंगावर गोचड्या, तांबवा, वगैरे किडे उत्पन्न होऊन त्यांचे स्वास्थ्य नाहींसें होते, व त्यामुळे त्यांचे प्ररुतीवर वाईट परिणाम होतो. गाईना जरी पुष्कळ दिवस धुतले नाही, तरी त्या मशीइतक्या घाणेरड्या कधीही होत नाहीत. यावरून त्यांना मुळीच धुवू नये असें बरीक अनुमान निघत नाहीं. निदान पंधरा दिवसांनी तरी त्यांना धुवून काढावे. व्यायामः-गाई-मशींना रोजच्यारोज व्यायामही दिलाच पाहिजे. त्याना कुरणांत चरावयास सोडल्याने अवश्य तेवढा व्यायाम मिळतो व त्यांची प्रकृति साफ असते. पोळांच्या बाबतीत ही व्यायामाची बाब फारच महत्त्वाची आहे. त्यांना काहींना काही तरी काम करावयास लावलेच पाहिजे, नांगराची सोय नसल्यास गाडी तरी ओढावयास लावावे. त्यांना नुसते खावयास घालन बांधून ठेविल्यास त्यांचे अंगांत चरबी फार बाढते, व प्रजोत्पादक शक्ति कमी होऊन ते त्या कामास निरुपयोगी होतात. रानातील ओल्या गवतापासून गोठ्यांत दिले जाणा-या कडव्याची बरीच बचत होते. हे ओले गवत चांगले पौष्टिक असून जनावरांस चांगले मानवतें. एकतर त्याचा पौष्टिकपणा आणि दुसरे मैदानांतील खुली स्वच्छ हवा व व्यायाम हीसुद्धा त्यास मानवण्याची कारणे आहेत. ह्यावरून गुरे चारणीस घातली असतां ती थोड्याच दिवसांत कां चांगली होतात, हे तेव्हांच लक्षात येईल. चराई चांगल्या प्रकारची असली म्हणजे दुभत्या गाई-म्हशींस सुद्धा वाटतो तितका पेंडीचा वगैरे खुराक द्यावा लागत नाही. साधारण असें अनुभवास आलेले आहे की, मोठ्या दुभत्या गाईस शेर सवाशेर पेंड व थोडेसे मीठ ही दिली म्हणजे त्यांचे नुसत्या चराईवर चांगले भागते व दूधही कायम राहते.