पान:दूध व दुभते.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण चारा एकदम फार गेल्याने त्याचे पचन चांगले होत नाही, त्यामुळे गुरांस हगवण लागते किंवा त्यांची पोटें फुगतात. ३. ओल्या चाऱ्यांत पाण्याचे प्रमाण फार असल्यामुळे गुरांस तो पुष्कळ यावा लागतो. साधारण नियम असा आहे की, सुका चारा जितका अवश्य आहे त्याचे दुप्पट ओला चारा दिल्याने शरिरास लागणा-या पौष्टिक द्रव्यांचा पाहिजे तेवढा पुरवठा होतो. पावसाळ्याचे दिवसांत ओला चारा मुबलक मिळाल्यामुळे गरें तो खूप खातात व पातळ हागू लागल्याने जिकडे तिकडे घाण करितात. म्हणून सुका व ओला चारा मिळून या दिवसांत द्यावा. (४) उन्हाळ्याचे दिवसांत ओल्या चान्यापासून जनावरांवर फारच चांगला परिणाम होतो. त्यांतले त्यांत दुभत्या गाई म्हशींना तो अगदी अवश्यच माहे. अशा दिवसांत पुष्कळ गाई-म्हशी चांगल्या ओल्या चान्याचे अभावामुळे दूध कमी करितात किंवा आटतातही. तेव्हां ओला चारा नेहमी मिळेल अशी काही तरी व्यवस्था असलीच पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था ठेवण्यास थोडी फार जमीन पाहिजे, झणजे तीत ओल्या चान्याची पिके करितां येतील. किंवा पावसाळ्याचे शेवटी ओला चारा मुबलक असतो अशा वेळी जर तो नीट जतन करून ठेविला, तर पुढे टंचाईच्या वेळी तो उपयोगी पडेल. ओला चारा ओल्या स्थितीत जतन करून ठेवण्याची एकरीत आहे, तीस इंग्रजीत “ एनसायलेज" असे म्हणतात, व अशा रीतीर्ने जतन केलेल्या चान्यास “सायलेज" असें ह्मणतात. ती रीत अशी:-~-जमिनीत चान्याच्या मानाने लहान अगर मोठा खड्डा करून त्याचा तळ व बाज शेणमातीने चांगल्या लिंपून काढाव्यात, व प्रथम गवताचा किंवा पाल्याचा ६ इंच थर द्यावा व जो चारा सांठवावयाचा असेल, त्याचा एक फूट जाडीचा थर द्यावा व शक्य तितका तो दाबून बसवावा. नंतर त्यावर अर्धार माठ शिपड़ाव व नतर दुसरा थर यावा. असें तो खळगा भरपरी कोपन्यांतून व बाजूकडे तुडवून तुडवून शक्य तितका चारा भरावा, असे न केल्यास बाजूने व कोपन्यांतून हवा जाऊन सर्व चारा कुजून जाईल. एक दिवसांत तो चारा खूब खाली दबतो. त्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणेच थर यावेत. शेवटी किरकोळ गवताचा थर देऊन तो सर्व चर मातीच्या १ फूट जाडीच्या थराने बुजवून टाकावा व आंत हवा बिलकूल जाणार नाही, अशी व्यवस्था करावी. सप्तंबरच्या दुसन्या पंधरवड्यांत अशा रीतीने चारा सांठवावा, व तीन महिन्यानंतर वाटेल तेव्हां तो उकरून काढावा, वरचे थर टाकावेत व आंतील पिंवलद भाग गुरांस थोडथोडा द्यावा. गुरें तो आनंदाने खातात.