पान:दूध व दुभते.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ रें.] जनावरांची जोपासना. १७ लवकर होते. जनावरांस विलायती गवताचा रतीब असल्यास त्याचेही असेच तुकडे करून कटाई बरोबर मिसळावे म्हणजे जनावरास हिरवे तेवढेच निवडन खाता येत नाही, व हिरव्याच्या लालचीने कटाई आनंदाने खातात. कटाई गुरांश देण्यापूर्वी काही तास पाण्यात भिजविण्याचीहि वहिवाट आहे. कडव्याविषयी इतकी काळजी व मेहनत घेणे आपले इकडील शेतकन्यास प्रथम फारच कठीण जाईल. एखाद्या लष्करी मनुण्यास नाचण्यांनी भरलेले वन्याचे तांदूळ निवडावयास सांगितल्यावर जशी त्याची स्थिति होईल, तशीच अवस्था गुडघ्यावर मोडून किंवा पेंढीच्या पेंढीच गुरापुढे टाकणाचा शेतकयाची होईल. परंतु कडबा बारीक तोडल्यापासून होणान्या फायद्याकडे लक्ष्य दिले असता त्याचे महत्त्व ध्यानात येईल. ओला चारा:-जोंधळा, मका वगैरे धान्यांचे ओले बाटूक, मूग, उडीद, कुळीथ वगैरेचे ओले वेल, विलायती गवत, साधे हिरवें गवत वगैरेचा समावेश वरील सदरांत होतो. या प्रकारच्या चा-याविषयी खाली दिलेल्या गोष्टी ध्यानांत ठेवाव्या. १. बाटूक, वेल वगैरे जिन्नस जेव्हां फुलू लागतात, त्याच वेळेस काढावेत व जनावरांस खावयास द्यावेत. कारण त्या वेळेपर्यंत ह्मणण्यासारखा जून चरबटपणा त्यांत आलेला नसतो, व जनावरांस उपयोगी पडणा-या पौष्टिक द्रव्यांचे प्रमाणही जास्तीत जास्ती ह्याच वेळी असते. २. जोंधळ्याचे ओल्या चान्याविषयी एक दोन गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत. कोवळे बाटूक कापून थोडा वेळ ठेविल्यास त्यांत एक विषारी पदार्थ उत्पन्न होतो व ते जनावरांनी खाल्यास त्यांचा नाश थोड्याशा अवकाशांत होतो. अशा प्रकारचे अपघात पावसाळ्याचे तोंडी फारच होतात. कारण अशा वेळी जोंधळा कोवळा असतो व उन्हाळ्याचे दिवसांत ओला चारा न मिळाल्यामुळे गुरें तो आधाशाप्रमाणे खातात व मरतात. कधी कधी आरंभी पाऊस पडून नंतर पुष्कळ वेळपर्यंत जर अवर्षण झाले, तर जोंधळ्याचे झाडांत सोरमिठाचे शोषण जमीनीतून जास्त होते व त्या क्षाराचे प्रमाण बरेंच वाढते. ते इतके की, ताठ उभें चिरून पाहिल्यास त्यांत कांड्यांजवळ सोरमिठाचे खडे दिसतात व त्याची चवही घेता येते. अशा प्रकारचे बाटूक खाल्ल्यानेही ताबडतोब मरण येते. म्हणून जोंधळ्याचे बाटुकाविषयी फार खबरदारी घेतली पाहिजे. उन्हाळ्यांत जनावरास सुका चाराच फार प्रमाणांत मिळतो व पावसाळ्याचे आरंभी कोवळा हिरवा चारा गुरे फार खातात, व त्यांचे अन्नाशयांत आला