पान:दूध व दुभते.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ दूध व दुभते. [प्रकरण wwwwwww त्यांचा कोठा जात्याच मोठा असल्यामुळे त्यांचे पोट पुरे भरल्याशिवाय त्यांस समाधान वाटत नाही, व अर्धपोटी ठेवल्यास दूध कमी होते. ४ चारा कुजका, बुरशी आलेला किंवा किडका नसावा. ५ चारा नेमक्या वेळीच देत असावा. ६. चाऱ्याप्रमाणेच पाणी स्वच्छ असले पाहिजे. ज्या पाण्यात पाने वगैरे कुजून घाण झालेली असते, असें पाणी कधीही जनावरास देऊ नये; कारण त्यापासून अनिष्ट परिणाम घडतात. चान्याप्रमाणे पाणीही वेळचे वेळीच पाजले पाहिजे. तसें न केल्यास पोटदुखी लागते व पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. सुका चारा:-गुरांना जो सुका चारा दिला जातो, त्यापैकी जोंधळा, बाजरी वगैरेचा कडबा, वाळलेले गवत व गहूं कड-धान्ये वगैरेचा भुसा हीच मुख्य आहेत. त्यांपैकी कडब्याचीच नासाडी फार होत असते. उत्तर हिंदुस्थानांत जी कडबा चारण्याची रीत आहे, ती महाराष्ट्रातील शेतकन्यांनी मनन करण्यासारखी आहे. ती अशी:-जागेच्या सोयीप्रमाणे जमीनीत एक लाकडांचा ओंडा पुरलेला असतो. त्यांची कडबा तोडण्याची कु-हाड आपले इकडचे कु-हाडी सारखी नसते. आपले इकडच्या कुळवाच्या लोखंडी पातीप्रमाणे तिचा आकार असतो. लांबी एक वीत किंवा टीचभर असते व रुंदी चारपांच बोटे असते. अशी पोलादी पात एका साधारण दीड इंच रुंदीच्या चिंवट ळांकडी फळीत रुंदीचे बाजूने बसविलेली असते व फळीच्या एका बाजूस हातांत धरण्यास मूठ केलेली असते. मुठीसुद्धा त्या कुन्हाडीची लांबी १४।१५ उंच असते. कडबा तोडणारा इसम एका हातांत मावतील तेवढीच चिपाडे चंडीतन घेऊन परलेल्या लांकडावर ठेवून बोटाच्या एका कांड्याएवढे कडव्याचे तकडे हाताल अशा बेतानेच कुन्हाडीचा घाव देतो. घावाबरोबर तोर लाकडाच आड्यापासून १-२ फुटाच अंतरावर आपोआप को नर्थ त्यांचा ढीग आपोआपच हातो. हाताने एकीकडे ते सायास गरज पडत नाही. अशा रीतीने तोडलेल्या कडव्यास "कटाई" अथवा "कटिया" असें ह्मणतात. कटाई तयार झाल्यावर त्यावर थोडेसे पाणी शिंपडून ओलसर करितात. गुरास पेंडीचा जर खुराक असेल तर तो निराळा न देता पेंड भिजवून कटाईबरोबर मिसळून देण्याची वहिवाट आहे. अशा प्रका. रचा चारा नुसत्या जमिनीवर कधीही देता येणे शक्य नाही. तिकडे बहुतेक ठिकाणी मातीची नांद किंवा कंडी प्रत्येक जनावराकरिता असते. कडबा अशा रीतीने दिल्याने गुरें गवाणीत कटाईचा लेशसुद्धा उरूं देत नाहीत. कडबा थोडा पुरतो व नासाडी होत नाही. कटाईचे चर्वण चांगले झाल्याने पचनही