पान:दूध व दुभते.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जनावरांची जोपासना. १५ अन्न प्राण्यास मिळाल्यास चांगली कामें करण्याची पात्रता त्यांचे अंगी येते, हे निराळे सांगणे नकोच. आतां सर्वच जनावरांस एकसारखीच कामें कधीही करावयाची नसतात. धमणीस जुंपावयाच्या बैलांचे काम एक, तर नांगरटीच्या बैलांचे काम दुसरेंच, दुभत्या गाईचे काम एक प्रकारचे, तर गाभण गाईचे निराच्याच प्रकारचे, व वाढत्या वासराचे काम तर सर्वांहूनही भिन्न असते. नांगराच्या बैलाचे अन्न साध्या रेलापेक्षा जास्त सकस असले पाहिजे. गाभण गाईत आपले शरीरांतील व्यय भरून काढून गर्भाची वाढ करावयाची असते. व वाढत्या वासरांस आपले स्वतःचे शरीरांत भर टाकावयाची असते. म्हणन अशा जनावराचा चारा निराळ्या प्रकारचा असला पाहिजे. एकंदरीत जनावरांचे परिस्थितीप्रमाणे चान्याचे प्रमाण व चांगुलपणा बदलला पाहिजे. तत्पर शेतकरी आपल्या जनावरांची निगा राखतांना खाली दिलेल्या गोष्टी कधीही विसरत नाही, व विसरणार नाही. १. दुभत्या जनावरांस जो चारा द्यावयाचा तो पौष्टिक, रुचकर, खाण्यास मऊ व पचण्यास हलका असावा. जून चरबट गवत किंवा बांबूसारखा कडबा देऊ नये. कारण त्यापासून दूध न वाढतां उलट कमी होण्याचा मात्र संभव आहे. -- २, चारा देणे तो कधी न तोडतां राशीच्या राशी गुरांपुढे टाकू नये. एक तर त्यांना तो नीट खातां येत नाही; दुसर ती लवकर कंटाळतात, व पायाखाली तुडवून त्या चान्याची नासाडी करून टाकितात. आपला स्वतःचाच अनुभव पहा. वाढणान्याच्या हातून जर आपणांस पाहिजे त्यापेक्षा जरा जास्त अन्न आपले पानांत पडलें, किंवा सबंध जेवणांत खाल्ले जाणारे पदार्थ जर एकदम पानांत वाढले, तर आपल्याला किती तरी राग येतो. पोट भरल्यासारखे वाटन जेवण कंटाळवाणे होते व अन्नाची उगीच नासाडी होते. तेव्हां जी गोष्ट आपणास लागू तीच जनावरांस. याकरितां त्यांना रुचेल अशाच रीतीने चारा दिला पाहिजे. आपले इकडे कडव्याचे फारच मोठे तुकडे करितात. नेहमी बहुतेक एका पेंढीचे दोन तुकडे होत असतात. पुष्कळ वेळां सबंध पेंढीच्या पेंढीच गुरांपुढे येते. अशाने चान्याची फार नासाडी होते. शिवाय दुभत्या जनावरांना नेहमी एकच त-हेचा चारा देऊ नये. मधून मधून रुचीचा बदल केल्याने खाणे कंटाळवाणे न वाटून ती आनंदित असतात. ३. जो चारा देणे असेल तो पोटभर दिला पाहिजे. भात खाणाचा मनुव्यास जसें नुसत्या पोळीचे किंवा भाकरीचे जेवणाने चकल्या चकल्या सारखे वाटते; कारण नेहमी भाताने गरगरीत पोट भरण्याची संक्य असल्यामुळे पोटाची पिशवी भरल्याशिवाय तृप्तता वाटत नाही. तसेच गाई-मशी तृणभक्षक असून