पान:दूध व दुभते.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभतें. [प्रकरण प्रकारच्या धुवणांत खताचे दृष्टीने फारच महत्त्वाची द्रव्ये असतात व ती कोणताही दक्ष मनुष्य वाया दवडणार नाही. गोठ्यांतील धुवण आसपास मुरू दिल्यास त्यांतील द्रव्ये कुजतात व घाणेरडे वायु उत्पन्न होऊन हवा चिघडवि. तात. मुरुमाची किंवा त्यापेक्षां कच्ची जमीन असल्यास ती रोज धुवं नये. धुतल्यास आंत पाणी मुरून ती दमट राहील. अशा जमीनीवर मातीचा वगैरे थोडा थर देऊन तो प्रत्येक चार आठ दिवसांनी काढावा, व ती माती खताचे गारीत पसरावी व गोठ्यांत नव्या मातीचा थर द्यावा. असे केल्याने जमीन कोरडी राहून खतही वाया जात नाही. ८. खताची पार गोठ्यापासून लांब असावी. प्रकरण ३ रें. जनावरांची जोपासना. चारा आणि पाणी. नसत्या स्वच्छ हवेनं व उत्तम गोठ्यांनी जनावरे चांगली वार नाहीं. तर त्यांची नीटनेटकी निगा राखण्यास त्यांच्या चान्यापाण्याविषयीही फार काळजी घेतली पाहिजे. प्रथम आपण चारा व पाणी यांच्या आवश्यकतेविषयी थोडासा विचार करूं. प्रत्येक प्राणीमात्राकडून जें जें कार्य होत असते, तें तें कार्य घडवून आणण्यास त्या प्राण्यास एक प्रकारची शक्ति खर्च करावी लागते. उदाहरणार्थ, आपलें हसणे, बोलणें अपनी विजार करणे. वगैरे प्रत्येक कार्यास आपणास काही तरी शक्ती खर्च करावी लागते. काही कामें आपल्या अगदी अंगवळणी पडलेली असतात, म्हणन अशा कामाकरितां आपणास शक्ती घालवावी लागते असे वाटत नाही. जर्से, आपली प्रकति ठीक असतांना आपले स्वतःचे शरीराचे ओझें वाहण्यास आपणास फारसे किंबहना काहीच श्रम करावे लागत नाहीत, असे घरांत फिरतांना वाटते. परंतु लांब दौड करतांना किंवा एखादा डोंगर चढत असतांना आपलेंच शरीर ण्यास काही विशेष शक्तीची जरूरी आहे, असें थोडक्याच अवकाशांत आढळून येते. शिवाय प्रत्येक कार्याबरोबर आपले शरीराच्या काही भागाचाही व्यय होत असतो. हा व्यय अन्नच भरून काढते व शक्तीचाही पुरवठा तेच करीत असते. यावरून अन्नाची आवश्यकता किती आहे, हे तेव्हांच कळून येईल, व उत्तम