पान:दूध व दुभते.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रें.] दूधघरे आणि त्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी. १३ arwanammmmmmmmmmmmmmmam भोंके न ठेवितां त्यास जर दारे लाविली तर ती प्रसंगोपात् बंद करितां येतात; दिवसांतून कांही वेळतरी सूर्याची किरणें गोठ्यांत येतील, अशी व्यवस्था असावी. सूर्य-किरणें आत आल्यामुळे गोठ्यांतील जमीन लवकर सुकते व ओलीमुळे होणारे वाईट परिणाम कमी होतात. गोठ्यावरील छप्परही मध्ये हवा खेळण्यास जागा ठेवून (सोजीरांचे बराखीप्रमाणे ) करावें. असे केल्याने गुरांचे श्वासोच्छ्वासापासून झालेली वाईट गरम हवा त्या खुल्या वाटेने निघून जाते. अलिकडे ह्यापेक्षाही गोठे हवाशीर करण्याकरितां जमीनीसरपटर्मितीत जाळीदार खिडक्या ठेवण्याची पद्धत निघाली आहे. यामुळे श्वासोच्छ्वासापासून व मलमूत्राचे विघटीकरणापासून उत्पन्न झालेले अपायकारक जड वायु त्या वाटेने बाहेर जातात व बाहेरील स्वच्छ हवा आंत येते, अशा रीतीने शुद्ध हवेचा मंद प्रवाह गोठ्यांत नेहमी चालू राहतो. ___४. थोड्या जागेत पुष्कळ जनावरे बांधणे कधीही चांगले नाही. प्रत्येक जनावरास नवीन पद्धतीप्रमाणे चार फूट रुंद व सात आठ फूट लांच जागा दिली पाहिजे. इतकी जागा दिल्याने जनावरांस मोकळेपणाने उठता बसतां येते. गोठ्याच्या भिंतीची उंची कमीत कमी १०॥१२ फूट तरी असावी, म्हणजे प्रत्येक गुरास ४४८x१२=३८४ घनफूट तरी पोकळी दिली पाहिजे. असे केल्याने अवश्य तितकी स्वच्छ हवा जनावरांस मिळते. गोठ्याच्या भिंती पक्या किंवा कच्च्या सोयीप्रमाणे असाव्यात. कुडाच्या भिंतीस आगीची भिती असते. पक्या भिंती केल्यास सारवणे व चुना देणे ही कामें नीट करितां येतात, ५. गोठ्याची जमीन फरसबंदी किंवा मुरुम चोपून चांगली पछी केलेली असावी ह्मणजे त्यापासून पुष्कळच फायदे होतात. पक्की जमीन. धुवून लवकर साफ करितां येते. अशी जमीन गुरांच्या शेणमुतामुळे व तुडवणीमळे चिखलमय होत नाही व त्यामुळे शेणमुताचीही खराबी होत नाही. मत्र, पाणी वगैरे आंत न मुरल्यामुळे जमीन ओली व सर्द होत नाही. संसर्गजन्य रोगाने एखाद्या जनावराचा नाश झाल्यास पक्क्या जमीनी फारच थोड्या प्रयासाने शुद्ध करिता येतात. ६. जमीनीस मागचे बाजूस ढाळ ठेवावा. असे केल्याने जनावरांचे मत्र पडल्या ठिकाणीच न मुरतां नाल्याकडे ओघळून जातें, व खताच्या दृष्टीने मुत्रासारख्या महत्त्वाच्या पदार्थाची नासाडी होत नाही. ७. गोठ्याचे मागचे बाजूस पक्का नाला असावा व तो खत सांठविण्याचे गारीत सोडावा. म्हणजे जनावरांचे मूत्र व गोठ्यांतील जमीन धुतल्याचे पाणी आसपासचे जमीनीत न मुरता तें थेट खताचें गारीत जाऊन पडते. अशा