पान:दूध व दुभते.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभतें. [प्रकरण वगळून दुभत्या गाईह्मशी नेहमी किती राहतील हैं लक्षात घेऊन मागणीप्रमाणे गाईह्मशांची संख्या ठरवावी. साधारणपणे शंभर गाईत पन्नास पासून साठ पर्वत दूध देणाऱ्या गाई असतात. ह्या प्रमाणांत जनावरांची संख्या निश्चित करावी. शिवाय गाईहशींचे संख्येप्रमाणे पोळांचीही संख्या कमी अधिक करावी लागते. साधारण असा नियम आहे की, प्रत्येक ४०।४५ गाईमागें एक पोळ असला पाहिजे. ह्या प्रमाणांत पोळ ठेविल्यावर फळणीचे काम चांगले होऊन पोळांचे प्रकृतीवरही वाईट परिणाम होत नाही. हे पोळ अस्सल अवलादीचे असले पाहिजेत. कारण त्यावर दूधघराच्या यशस्वीपणाची मदार अवलंबून असते. गोठ्याची रचना. दूध-घरासंबंधी गुरांचे गोठे ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. कारण त्यावर गरांचे आरोग्य अवलंबून असते. लहानशा कोंदट गोठ्यांत पष्कळ जनावरं बांधिली असतां सांथीचा आजार फारच जारीने फैलावतो व पुष्कळ गुरे थोड्या अवकाशांत प्राणास मुकतात. परंतु तेच त्यांचे गोठे चांगले बांधले तर, असली संकटें फारच कमी उद्भवतात. एखादें जनावर आजारी झालें तर. त्यास इतर गुरांपासून दूर केल्यास तो आजार इतर जनावरांत पसरत नाही. जनावरांचे गोठे खाली दिलेल्या नियमान्वये बांधल्यास फारच उत्तम. गोमांची जागा उंचवट्यावर पसंत केल्यास जमीन कोरडी राहते, व पावसाळ्याचे दिवसांत गोठ्यांत पाणी शिरत नाही. पावसाळ्याचे दिवसांत गरांचा गोठा कोरडा असणे फार महत्वाचे आहे. आधीच त्याचे शेणामताने जी जमीन ओली होते, ती वाळतां वाळत नाही, आणि त्यांतलेत्यांत जमीनी सखलपणामळे पावसाचे पाणी एकदां आंत मुरले झणजे पावसाळाभर कोरड्या जागेची आशाच नको. २. गोठ्यांची उघडी बाजू किंवा दार हा वान्याच्या वहाटीच्या अनरोधानेच पाहिजेत. ज्या बाजूने नेहमी वारा वाहतो, त्याबाजूस दरवाजे कधीही करूं नयेत. कारण तसे केल्यास थंड अगर उष्ण हवा सारखी वहात राहिल्याने गुरांस अपाय होतो. तेव्हां नेहमी वान्याच्या बाजूस भिंत असावी, झणजे वाटल्या वाऱ्यापासून बचाव होतो. समशीतोष्ण कटिबंधांत अतिउष्ण व अतिथंड हवपासून होणारे वाईट परिणाम फारच दृष्टीस पडतात.. ३. गुरांचा गोठा अंधेरा व कोंदट कधीही असता कामा नये. गोठा हवाशीर करण्याकरितां जागोजाग खिडक्या ठेवाव्यात. खिडक्यांतून वान्याचा झोत अगावर येऊ नये, म्हणून त्या जनावरापेक्षां ३।४ फूट उंच असाव्या, उघडीच