पान:दूध व दुभते.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रें]. दूधघरे आणि त्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी. www 3. गांवांतील ज्या दिशेने वर्षातून पुष्कळसे महिने हवा वहात असते, त्या दिशेस गांवापासून दूर जागा पहावी. ह्मणजे गांवांतील घाणेरडी हवा दूधघराकडे फारशी येण्याचा संभव कमी राहील. ४. दलदली, पांदी, किंवा ज्या ठिकाणी गावांतील घाणेरडे पाणी सांचण्याचा किंवा मुरण्याचा संभव असतो, अशा ठिकाणांचा शेजार अती वाईट असतो. येथील पाणी दूषित असण्याचा फारच संभव आहे. दूधघरांस सफाईकरितां पाण्याचा पुरवठा पुष्कळ लागतो व नोकरांकडून थोडासा जरी हलगर्जीपणा झाला तरी दूध बिघडते, व सांथीचे दिवसांत न-कळत गि-हाईकांस तें दूध वाटले गेल्यामुळे रोग फैलावतात. दलदलीचा शेजार नेहमीच वाईट असतो. कारण अशी ठिकाणे म्हणजे-रोगजंतूंची माहेरघरेच होत. का ५. नजीकच चांगल्या स्वच्छपाण्याचा संचय असला पाहिजे, कारण दूधघरांची स्वच्छता व जनावरांची नीट निगा राखण्यास पाणी पुष्कळ लागते. नदीकिनारा असल्यास फारच चांगलें. नाही तर, मोठे तळे, किंवा एखादा वाहतां ओढा तरी जवळ पाहिजे. जनावरांचे मलमूत्र पिण्याचे पाण्यांत कधीही न जाऊ देण्याविषयी काळजी घेतली पाहिजे. गुरांची धुण्याची जागा नेहमी दूर असावी. ६. दूधघरापासून जवळच १।२ मैलांचे आंत चराईची जागा किंवा कुरण असावें. अशा कुरणापासून गुरांस चारा चांगला मिळून विकत घेतलेल्या चायाचा पुष्कळ काटकसरीने उपयोग करितां येतो व खर्च कमी होतो. गुरांना स्वच्छ हवाशीर कुरणांत चरावयास मोकळे सोडले ह्मणजे, ती इकडे तिकडे धांवतात, बागडतात व आपणांस नेहमीच बंदीवास नाही, आपण आपल्या नैसर्गिक परिस्थितीतच आहोत, असें वाटून ती नेहमी आनंदी असतात. शिवाय त्यांचे अवयव बळकट होऊन ती नेहमी निरोगी राहतात. दुभत्या जनावरांची संख्या. जनावरांची संख्या कमीत कमी किती पाहिजे व जास्तीत जास्ती किती ठेवितां येईल हेही ठरविले पाहिजे. कारण त्या संख्येप्रमाणे गुरांचे गोठे वगैरे बांधणे, त्यांच्या चान्या-पाण्याची व्यवस्था करणे व चराऊ राने विकत घेणे, मजूर लावणे, वगैरे गोष्टीसंबंधी विचार करावयाचा असतो. ही संख्या निश्चित करणे दुधाच्या वगैरे मागणीवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मागणी जास्त त्याप्रमाणे संख्याही मोठी असली पाहिजे. पुष्कळ जनावरें ठेविल्यास मजूरीही काही बाबतीत फायद्यांत पडते. गाभण किंवा आटलेल्या गाईझशी