पान:दूध व दुभते.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हम दूध व दुभते. [प्रकरण त्यापासून फायदा होईल. कारण अशा ठिकाणी मोठमोठ्या हुद्याचे व श्रीमंत लोक राहतात, आणि त्यांतल्या त्यांत युरोपियन लोकांस इंग्रजीपद्धतीने तयार केलेल्या लोण्यीचा वगैरे फारच गरज असते, म्हणून चांगला फायदा पडतो. पुष्कळ वेळां असें होते की, मोठमोठ्या शहराजवळ असली घरे काढण्यास खर्च फारच येतो; व पुढेही धंदा महागाईमुळे चांगला जोरावत नाही. अशा वेळी रेलवेच्या आजूबाजूस परंतु शहरापासून थोड्या अंतरावर एखाया खेड्याजवळ जर दूधघरें स्थापिली तर त्यापासून पुष्कळ फायदा होतो. कारण अशा ठिकाणी जमीनी कमी किंमतीस मिळतात. गुरांचा चारा स्वस्त मिळतो, व मजूरीही फार होत नाही. रेलवेलाईन जवळ असल्यामुळे सदरील धघरांत तयार झालेले दूध, लोणी वगैरे पदार्थ वेळचेवेळी शहरांतील गि-हाइकांसे पोंचवितां येतात. आतां कोणा धार्मिक गृहस्थास धर्मादाय दूध वाटण्याकरितां दूधघरे काढावयाची असतील तर जेथे जेथें हीनावस्थेस गेलेल्या लोकांची वस्ती आहे किंवा अनाथबालकाश्रमासारख्या संस्था आहेत, तेथे तेथे काढल्यास अन्न अन्न करीत असलेल्या लेकरांस दूध मिळून त्यांची क्षुधा शांत होईल, व तितका त्या दात्यास धन्यवाद मिळेल. जागेची पसंती. योग्य ठिकाण पसंत केल्यावर दूधघरांकरितां चांगली जागा पाहिली पाहिजे कारण त्या जागेवर दूधघरांतील गाई मशीचें व नोकरांचे आयुरारोग्य पुष्कळ अंशी अवलंबून असते. ह्मणून होतां होईल तो चांगली जागा पसंत करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. जागेची पसंती करतांना खाली दिलेल्या गोष्टी ध्यानात ठेवण्यासारख्या आहेत. १. जागा सखल भागांत न पाहतां साधारण उंचवट्यावर पहावी, म्हणजे पावसाच्याचे दिवसोत पाणी सांचन चिखल होत नाही, व त्यामुळे हवा बिघडत नाही. सखल जमिनीतील ओलावाही लवकर नाहीसा होत नाही. त्यामुळे तेथील हवा दमट राहून डांस वगैरे गुरांस फार त्रास देतात. उंचवट्यावरची जमीन भिजल्यास लवकर वाळून कोरडी होते व हवाशीरही जास्त असते. २. आसपासच्या भागांतील वातावरण दमट व सर्द नसावें, कारण सर्द हवेमुळे गुरांस अनेक रोग जडतात व दूध नासते. अशा प्रकारची हवा सूक्ष्म जंतचे जोपासनेस फारच नामी असते व अशा स्थितीत त्यांची वाढही फारच झपाट्याने होते. सांथीचे रोगांमुळे अशा ठिकाणी गुरांचा फार नाश हाण्याचा संभव असतो.