पान:दूध व दुभते.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रें]. दूधघरे आणि त्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी. , महत्वाची आहे. गाय जरी चांगल्या अवलादीची असली व तिला पुष्कळ दूंध असले, तरी पण ती जर तापट स्वभावाची असेल, तर तिच्यापासून फायदा होईलच असे कधीही मानणे रास्त नाही. कारण ती एखादे क्षुल्लक कारणावरून सुद्धां बिथरून दूध बंद करील. परंतु साधारणपणे ज्या गाई जातवान दूध देणाऱ्या असतात, त्या नेहमी गरीब व शांत स्वभावाच्या असतात. त्यांचे चालणे मंदगति असते, त्यांचे डोळे व चेहरा मातृप्रेमाने अगदी भरलेला दिसतो. जनावरांची निवड करतांना दुधाविषयी प्रसिद्ध असलेल्या जनावरांच्या शारीरिक खाणाखुणाही पाहून घ्याव्यात. त्यांपैकी काही खाली दिल्या आहेत. (क ) शरीर साधारणपणे हडकुळे असावें. (ख) केस मऊ व कातडी पातळ असावी. (ग) मानेकडील भाग बारीक व पातळ असावा. (घ) मागचा भाग रुंद व मोठा असावा. (च) तोंड लांब, डोळे मोठे, शांत व पाणीदार असावे. (छ) कान मोठे व लोंबते असून आंतील कातडी पिवळी असावी. (ज) कांस मोठी पाहिजे. कांही गाईची कांस मोठी दिसते, परंतु तीत पुष्कळ दूध मावत नाही. कारण ती मांसल असते. ज्या गाईची कांस धार काढल्यास सुरकुतन जाऊन पहिल्यापेक्षां पुष्कळच लहान होते, त्या गाईची दुधाची धारणाशक्ति चांगली आहे असे समजावें. (झ) आंचळे, सारख्या आकाराची सरळ व समांतर असावीत. ती फार लोंबतीही वाईट व फार आंखूडही वाईट. (ट) दुधाची धार मोठी असावी व दुधाचा रंग निळसर नसावा. (ठ) कांसेकडे जाणारी रक्तवाहिनी मोठी व फुगलेली असावी, याशिवाय शरीरांत कोणत्याही प्रकारचे व्यंग असू नये. दूधघरास योग्य ठिकाण. दूधघरे बांधतांना त्यांस योग्य ठिकाण कोणते आहे, हेही ठरविले पाहिजे. ज्या प्रमाणे भांडवल व ते घालण्याचा उद्देश असेल त्याप्रमाणे व दूधघरापासून फायदा काढावयाचा असेल, किंवा साधारण दर्जाचे मनुष्यास थोड्या किमतीस दूध द्यावयाचे असेल व गोरगरीबांस फुकट दान करावयाचें असेल, त्या मानाने दूधघरास ठिकाण पसंत केले पाहिजे. फायद्याकडेच नुसती नजर असली तर दूधघरे मोठ्या शहराजवळच बांधावीत, म्हणज