पान:दूध व दुभते.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण कऱ्यास सांगणे नकोच. शेत, शेतकी व शेतकरी यांच्या जेवढ्या गरजा उच्चनीच स्थितीतील शेतकरी व जहागिरदार वर्गास कळण्याचा संभव आहे तशा दुसऱ्यास कळणे शक्यच नाही. व निरनिराळ्या प्रकारच्या गुरांची पैदास घरे राखण्याचे काम जितके चांगल्या रीतीने गवर शेतकन्यांचे व जहागिरदारांचे हातून होईल, तितकें इतरांच्या हातून होणे शक्य नाही. प्रकरण २ रें. -noteionदूधघरे आणि त्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी. दूधघरे आणि त्यांचे महत्त्व. । प्रस्तुतप्रसंगी दूध व दुभते ह्यांविषयींच विचार करावयाचा असल्याम प्रथम दूधघरें स्थापण्यापासून किती महत्त्वाचे फायदे होण्यासारखे आहेत. त्याचा थोडक्यांत विचार करूं. एक तर दूधघरे स्थापल्याने दुभत्या गाईम्हशीच्या अवलादीत जनावरांच्या निवडीमुळे कनिष्ठप्रकारच्या अवलादीची किंवा दूषित रक्ताची भेसळ होण्याचा फारच कमी संभव राहील आणि म्हणूनच दिवसें दिवस ती दुभती अवलाद जास्त सुधारत जाऊन कांहीं काळाने अस्सल प्रकारची होईल. अशा ठिकाणापासून सभोवतालचे प्रदेशांत चांगल्या प्रकारच्या गाईम्हशींचा व अस्सल पोळांचा पुरवठा होईल, व या रीतीने हळुहळु सभोवतालचे भागांतील दुभत्या गाई म्हशींची स्थिती सुधारून साधारण शेतकन्यांसही त्यांपासून फायदा काढून घेता येईल. तसेच दुधासारख्या नैसर्गिक, सात्त्विक व पौष्टिक अन्नाचा चांगला पुरवठा होऊन गोरगरीबांस ते थोड्या किंमतीसही देता येईल. ह्या संस्था जागोजाग स्थापल्याने दुधाचा पौष्टिकपणा व शुद्धता यांविषयी जास्त काळजी घेतली जाऊन, जवळपास राहणाऱ्या मनुष्यांस उत्तम शुद्ध दूध मिळाल्यामुळे त्या भागांतील सार्वजनिक आरोग्यावरही चांगला परिणाम होईल. ज्यावेळेस महामारी सारख्या संसर्गजन्य रोगाची साथ उत्पन्न होते, त्यावेळी शुद्ध दुधाचे महत्त्व दिसून येते. कारण दूध हे जसे आपणांस पौष्टिक अन्न आहे, त्याप्रमाणेच ते नानाप्रकारच्या सक्ष्म जंतसही चांगलेच मानवतें व त्यांची पैदास त्यात उत्तम तन्हेने होते. म्हणून थोडासा हलगर्जीपणा झाल्याबरोबर दूध नासर्ते व साथी