पान:दूध व दुभते.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwwwwwwwwwwraamanaranaanawwwnwww २ रें.] दूधघरे आणि त्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी. xxxmmmmmm च्या दिवसांत लाखो सूक्ष्मरोगजंतु त्यांत उत्पन्न होतात, व ते रोग फारच जारीने फैलावतात. शिवाय ह्या धंद्यापासून नफाही काढून घेता येतो. कारण सर्वगुणसंपन्न दुधाचा जितका जास्त पुरवठा होणे शक्य आहे, तेवढा मनुष्यास हवाच आहे, व दुध ही वस्तु मनुष्याचे अन्नापैकी अवश्य लागणारी वस्तु असल्यामुळे, दाट वस्तीच्या भागांत तिच्याविषयी मागणी कमी होण्याचे कधीही संभवनीय नाही. - वरील सर्व गोष्टींचा थोड'सा शांतपणे विचार केला असतां, जागोजागी दूधघरे स्थापविण्याचे काम किती जरूरीचे व महत्त्वाचे आहे, हे आपणांस आढळून येईल. अशी घरे स्थापण्यास थोडासा जास्त खर्च लागेल हेही खरे आहे. परंतु श्रीमंत व धार्मिक गृहस्थांनी ह्या महत्त्वाच्या कार्याकडे लक्ष्य दिले असतां व आपले दानधर्म करण्याचे पद्धतीस थोडेसें निराळे वळण दिले असतां, हे कार्य सहज घडून येण्यासारखे आहे. अलीकडे दानधर्म करण्याचे पद्धतीस निराळे वळण मिळतच आहे व निरनिराळ्या ठिकाणी फुकट औषधे वाटणे व रोग्यांचे शुश्रूषेकरितां दवाखाने बांधणे व जागोजाग अनाथ व पंगु वगैरे लोकांकरितां फंड उभारण्याकडे मदत करणे हे आपण नेहमी पाहतो. परंतु तितकेच महत्त्वाचे धर्मकार्य दूधघरें स्थापून गोरगरिबांस फुकट शुद्ध दूध पाजल्यानेही होण्यासारखे आहे. परंतु इकडे अद्यापपावेतों कोणी उदार सदय अंतःकरणाच्या धर्मशील गृहस्थाचें लक्ष गेलेले दिसत नाही, ही मोठी खेदाची गोष्ट होय. अलीकडे प्लेग, दुष्काळ इत्यादि कारणांमुळे अवश्य लागणाऱ्या धान्याचे द गुरांच्या चाऱ्याचे चढलेले भाव, जमीनीची मेहनत करण्यास अवश्य लागणाऱ्या जनावरांची उणीव, चढलेली मजूरी व उत्पन्नाचे मानाने साऱ्याचे ओझें वगैरे अनेक कारणांनी हिंदुस्थानांतील साधारण लोकांची इतकी दैन्यावस्था झाली आहे की, त्यास पोटभर सुखानें मीठभाकरही खावयास मिळत नाही; मग दुधा तुपाची गोष्टच नको. ह्या होनावस्थेमुळे तुपाचा थेंब, दुधाची धार आणि ताकाचे पाणी हे पदार्थ अलीकडे चैनीचे पदार्थात गणले जाऊ लागले आहेत. आम्ही आमचे वडीलमाणसाचे तोंडून ऐकलेली स्थिति, फार कशाला आमचे लहानपणची स्थिती व हल्लीची स्थिती यांची तुलना केली असता हल्लीच्या पिढीचा दुभळेपणा, निस्तेजपणा व निरनिराळे रोगांचा प्रादुर्भाव होणे यांचे अनेक कारणापैकी गाईबैलांसारख्या जनावरांची वाईट स्थिती व दुधातुपासारख्या पोष्टिक अन्नाचा दुष्काळ, ही प्रमुख कारणे आहेत, असे म्हणतां येईल. अशावेळी धार्मिक लक्ष्मीपुत्रांनी उदार होऊन निरनिराळ्या ठिकाणी दूध-घरें स्थापिली तर गोरगरीबांस फुकट किंवा काही थोड्याशा कमी किमतीस