पान:दूध व दुभते.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ लें]. शेतकरी आणि दुभंती जनावरें. TO जनावरांची पैदासघरें. ज्याप्रमाणे शेतकऱ्याचे काम जमीन व पिके यांची काळजी घेण्याचे आहे, त्याचप्रमाणे भापल्याशी निकट संबंध असलेल्या प्राण्यांची नीट काळजी घेऊन, त्यांची पैदास राखून व त्याजपासून जें जें काम होईल ते घेऊन, अधिक उत्पन्न काढून घेण्याचेही आहे. अशा प्राण्यांपैकी मेंढ्या व गुरेढोरे हीच मुख्यत्वेकरून हिदुस्थानातील शेतक-यांस फार महत्त्वाची आहेत. प्रस्तुतप्रसंगी आपणास गुराढोरांविषयींच जास्त विचार करावयाचा आहे. शेतकन्याने आपल्या व आपल्या आसपासच्या शेतक-यांचे गरजांप्रमाणे कोणत्या जनावरांची पैदास केली पाहिजे, हे ठरविले पाहिजे. लोकरीची वाण असली तर मेंढ्या राखल्या पाहिजेत. दुधातुपाची गरज असली तर दुधाविषयी प्रसिद्ध असलेल्या गाईहशींची पैदास व जतणूक केली पाहिजे, चपळ व सुंदर दिसणाऱ्या जनावरांची जर जास्त मागणी असेल तर त्या दिशेने गेले पाहिजे, व जड नांगरटीकरितां भक्कम बैलाची उणीव असेल तर असल्या बैलांच्या वाढीकडे त्याने आपले लक्ष्य पुरविले पाहिजे. ज्याप्रमाणे शेतकरी आपलें जमीनीचे मानानें व बाजारमागणीप्रमाणे आपली पिके काढतो, त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारच्या जनावरांची पैदास करणे, हे त्याने त्या त्या ठिकाणच्या मागणीप्रमाणे ठरविले पाहिजे. देशकाल-वर्तमानाप्रमाणे शेतकयांनीही आपल्या नेहमींच्या शिस्तीमध्ये फेरफार केला पाहिजे. स्वदेशहिताकरितां ज्याप्रमाणे वेळ येईल त्याप्रमाणे काही बाबतीत तरी बदलणे हे प्रत्येक स्वदेश हितचिंतकाचे कर्तव्यकर्म आहे. आतां एकाने नुसता जोंधळाच पिकविला म्हणून दुसऱ्याने दुसरे पीक न काढणे हे वेडेपणच आहे. काहींनी जिराइतें केली पाहिजेत, काहींनी भाजीपाला केला पाहिजे, काहींनी फळफळावळाच्या बागा राखिल्या पाहिजेत, व काहींनी जनावरांच्याही पैदासीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. ज्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची पिके काढणे, हे एक शेतकीचे अंग आहे, त्याप्रमाणेच निरनिराळी कामें देणान्या जनावरांची पैदास क्षेत्र राखणे ही सुद्धा एक प्रकारची शेतकीच आहे. आणि म्हणून काही ऐपतदार शेतकन्यांनी व जमीनदारांनी असल्या प्रकारची पैदासघरे राखणे हैं एक त्यांचे कर्तव्यकर्मच आहे. ज्याप्रमाणे हल्लीच्या प्रगतीच्या काळी निरनिराळ्या प्रकारचे कारखाने काढून, पेट्या स्थापून व शेतकी संस्थासारख्या संस्था व निरनिराळ्या प्रकारच्या खतांच्या व आऊतांच्या योगाने जमीनीची व पिकांची सुधारणा करून व थोडक्यात सांगावयाचें म्हणजे, जेणेकरून आपल्या देशाची स्थिती सुधारेल त्या दिशेने जाण्याचे प्रयत्न चालले आहेत, त्याप्रमाणेच आपल्या गुराढोरांचीही स्थिती सुधारणे किती महत्त्वाचे आहे, हे खऱ्या शेत