पान:दूध व दुभते.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण ~~nimammwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww सिंधी बैल अवजड कामास फारसे उपयोगी नसतात. यांचा रंग काळसर तांबूस असतो. २ गीर अथवा गुजराथी या जातीचे वसतिस्थान काठेवाडांतील गीर पर्वत व आसपासचा भाग हे आहे. गाई आकाराने मोठ्या असतात, कांस चांगली वाढलेली असते व आंचळ फार लांब असतात. लांबीच्या मानाने उंची जास्त असते. रंग तांबूस किंवा कबरा असून पांढरे ठिपके असतात. ही जात कपाळाचे फुगवटी वरून तेव्हांच ओळखता येते. शिवाय त्यांची शिंगेंही विशिष्ट प्रकारचीच असतात. ३ कोसी-ही जात मथुरा व कोसी प्रांतांत आढळते. गाई अंगाने बोजड़ नसून दिसण्यांत फारच चांगल्या दिसतात. त्यांचा रंग पांढरा किंवा करडा असतो. हसी: ही जात पंजाबांतील हिसार प्रांतांत आढळते. गाईचा रंग नेहमी पांढरा स्वच्छ असतो. सर्व अवयव अगदी प्रमाणात असतात. त्यांची मंदगती, सुबक ठेवण व पांढरा रंग यांवरून त्या गाईस हंसी हेंच नांव योग्य आहे, असें वाटल्यावांचून राहत नाही. हाशींच्या जाती:-गाईबैलांपेक्षा हशींच्या जाती फारच थोड्या आहेत. पैकी दुधाविषयी प्रसिद्ध असलेल्या खाली दिल्या आहेत. १ जाफराबादी:-ह्या जातीचे वसतिस्थान काठेवाडांतील गीरनार पर्वत हेच आहे. ही जात आकाराने अवाढव्य असून दिसण्यांत कुरूप असते. आकाराचे व खादीचे मानाने पाहिले असतां या मशी थोडे दूध देतात. डोके फारच फुगलेले असते. शिंगे डोच्याजवळून निघाल्यासारखी दिसन खाली पडून वळलेली असतात. रेडे फारच भक्कम व मोठे असतात. जड नांगरणीस त्यांचा फारच उपयोग होतो. ____२ सुरतीः-ही जात आकाराने लहान परंतु बांधेसुद असते. मशी सादीचे मानाने दूध पुष्कळच देतात. म्हणून त्यांचे पासून फायदा पुष्कळ होतो. ३ दिल्ली अथवा खुंदी:-ही जात आकाराने जाफराबादीची बरोबरी करणारी आहे. परंतु तीपेक्षां बांधेसूद असल्यामुळे तितकी कुरूप नसते. ह्या जातीच्या मशी सर्व हिंदुस्थानांत दुधाविषयी प्रसिद्ध आहेत, आणि झणून यांचा प्रसार चोहोकडे झाला आहे. या जातीची बरोबरी करणारी दुसरी कोणतीच जात नाही. ह्या जनावरांचे शिंगांचें वळण जाफराबादाच अगदी उलट असते.