पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/89

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 आयुष्याच्या या प्रवासात वारंवार आभाळात ढग आले. प्रत्येक वेळी मी कष्टपूर्वक व निग्रहाने लढले. माझी माझ्या सचोटीवर श्रद्धा होती. त्यामुळे आभाळ पेलताना खांदे हेलावले; पण मला बसायची वेळ आली नाही. ही सारी पुण्याई त्या अक्षरशः शेकडो अनाथ मुला-मुलींची, ज्यांची देखभाल, औषधपाणी, आजारपण, उष्टावळ सारं मी मनःपूर्वक केलं, त्याचं फळ. मी एक घर गमावले खरे; पण मिळाली हजार घरं. माझी नि माझीच.


दुःखहरण/८८