पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शेवटी वहिनींनी ऑफिसमधूनच आवाज दिला, “चला आत या."
 तशासरशी एकेक करून साच्या खाली मान घालून कोण तोंडावर हात करत, कोण खालीवर बघत, एकमेकीला ढकलत उभ्या.
 दादांनी विचारलं, “परीक्षा झाल्या का?"
 सर्वांचं एक सुरात उत्तर "नाही."
 परत दादांची विचारणा केव्हा संपणार?'
 कधी नव्हे ते मीराने तोंड उघडलं, “२० एप्रिलला संपणार, दादा."
 ‘‘शाब्बास तुझं नाव काय?" ‘‘मीरा!"
 “हे पाहा आपल्या आश्रमाजवळच एक नवीन शाळा सुरू होते आहे. हे दत्ता सावळे सर, चांगले शिकवतात. तुमच्याकडे लक्ष देतील. अभ्यास करून घेतील. एस.एस.सी.ला सगळ्या पास होतील, असं शिकवतो म्हणतात... जाणार कां? दादांनी प्रेमानं विचारलं.
 तशा सर्व मुली 'हो' म्हटल्या.
 मग दादांनी सर्वांना ‘जावा, अभ्यास करा, 'Best Luck' दिलं नि मुली 'Thank You' म्हणून बाहेर पडल्या अन् त्यांचा जीव एकदाचा भांड्यात पडला. सान्यांना दादांनी कशाला बोलावलं याची भीती होती. पाय लटपटायचे. कधी एकदा वाघाच्या गुहेतून बाहेर पडतो असं झालेलं.
 शेवटी जून उजाडला नि दादांनी मीराला मॉनिटर करून आठवी, नववीच्या सर्व मुलींना गौतम हायस्कूलला पाठवलं. त्यात मीरा, वसू, शीला, दिव्यप्रभा, मैथिली, सुशीला, राणी सर्व पंधरा-सोळा मुली होत्या, त्या मिळून जायच्या, मिळून यायच्या. त्यांची प्रगतीही चांगली होत होती.
 एस.एस.सी.चा निकाल लागला नि वहिनी संध्याकाळी हॉलमध्ये मुली वाचत बसलेल्या... तिथं आल्या. पास झालेल्या मुलींचं अभिनंदन केलं. नापासांची कानउघाडणी केली. ऑक्टोबरचा फॉर्म भरायला सांगितला. प्रत्येकीला उठवून पुढे काय करणार म्हणून विचारणा केली. टिपून घेतलं नि त्या निघून गेल्या. कोण नर्सिंगला, कोण डी. एड्.ला तर कोण बालवाडीला जाणार म्हणाल्या. सुरेखा कॉलेजला जाणार म्हणाली अन् सर्व मुलींच्या भुवया उंचावल्या.

 काही दिवसांनी वहिनींनी मीरा व वसूला ऑफिसमध्ये बोलवून बालवाडी प्रशिक्षण एक वर्षाचं आहे. कोसबाडला जावं लागेल. तिथं सर्व सोयी

दुःखहरण/७०