पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. अनुताई वाघ चांगलं शिकवतात, लक्ष देतात म्हणून सांगितलं नि दोघींनी एकमेकींकडे पाहत मान हलवून होकार दिला. दोन दिवसांनी तयारी होऊन वहिनी त्यांना कोसबाडला सोडून आल्या.
 वर्षासाठी गेलेली मीरा. वसू... वसू परत आली वर्षांनी. मीराला अनुताईंनी आणखी एक वर्षासाठी ठेवून घेतलं. त्या वेळी अनुताई वाघ सर्व शिक्षिकांना एकच वाक्य, शिकवण वारंवार सांगत देत असायच्या. ‘ही मुलं तुमची माना, त्यांचं जे काही करता येईल ते करा. त्यांच्या 'बाई' होऊ नका, 'ताई' 'आई' व्हा." मीरानं ही शिकवण आयुष्यभर लक्षात ठेवली.
 मीरा आश्रमाच्या बालमंदिरात शिकवू लागली. त्या वेळी आश्रमात शिकून मोठी झालेली मुलं दिवाळी, मे महिन्याच्या सुट्टीत आश्रमात त्यांना सांभाळणाच्या मानलेल्या आयांकडे येत. मीरा लक्ष्मीबाईंच्या खोलीत एव्हाना राहायला लागली होती. त्या खोलीत बिपिन, विठ्ठल, सुमंत सुट्टीत येत. अशा एका सुट्टीत गुजरातवरून गप्पा निघाल्या. बिपिन गुजरातला जाणार होता. मीराने गुजरात पाहिलेला. तिच्या माहितीचा बिपिनला भरपूर उपयोग झाला. एवढंच निमित्त झालं अन् दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं. बिपिन गुजरातला ननीताईची मोठी शेती सांभाळायचा. एका दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी दादांना आपला लग्नाचा मनसुबा सांगितला. दादांनीही संमती दिली व डिसेंबर, १९७२ ला मीरा-बिपिनचं लग्न झालं. मीराला घेऊन तो मढीला (गुजरात) शेती करू लागला.

 गुजरातमध्ये बिपिनबरोबर मीरा ननीताईंकडे राहायची. ती पण पंढरपूरच्याच आश्रमातली. बालवाडी शिक्षिकाच होती. ती लक्ष्मीबाईंच्याच खोलीत राहायची. त्यामुळे या सर्वांमध्ये एक मानलेले नाते, गोतावळा तयार झालेला. लग्न झालं तशी ननीताई नवच्याबरोबर दक्षिण आफ्रिकेत गेली होती. तिथं पैसे मिळवून त्यांनी गुजरातला नव-याच्या गावी शेत, घर अशी मोठी स्थावर घेऊन ठेवली होती. ननीताईचा नवरा अचानक वारल्यानं तिला लहान दोन मुलांसह भारतात परतावं लागलं होतं. वडिलार्जित घर, जमीन होतीच. शिवाय ननीताईच्या नवव्यानं भरपूर मिळवलं होतं. ती येऊन दीराकडे राहिली; पण त्याचा डोळा ननीताईच्या पैशाकडे असायचा. सारखे या ना त्या कारणांनी पैसे मागायचा. तिच्या लक्षात आलं की तो आपल्या एकटेपणाचा, असहाय्यतेचा गैरफायदा घेतोय. तिनं विठ्ठलबिपिन एकदा गुजरातला आले असताना कानावर घातलं होतं. त्यातून तिला आधार द्यायला बिपिन गुजरातला गेला होता; पण काही वर्षांनी

दुःखहरण/७१