पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कितीही प्रवाही, प्रभावी असला तरी ती सामान्याचा असल्यानं एक ना एक दिवस वास्तवाच्या कुंपणाजवळ येऊन थांबतो... आटतोच!
 शेवटी वकीलसाहेबांनी वसईच्या पोलीस ठाण्यात हारून अर्ज केला... जमीरा अनाथ, निराधार, बेवारस वेडी असल्याने पोलिसांनी तिचा ताबा घेऊन उपचार व पुनर्वसनार्थ तिची रवानगी मनोरुग्णालयात करावी.
 जमीराला ठाण्याच्या वेड्याच्या इस्पितळात दाखल केल्यानंतर जिवंत असूनही तिचा इहलोकापासूनचा संबंध तुटल्यात जमा होता. आता ती समाजाच्या लेखी ‘माणूस' नव्हती. ती होती ‘वेडी' शहाण्यानं वेड्यांच्या नादी लागायचं नसतं... ती जिवंतपणी मरणयातना भोगत राहिली... भोगत राहिली.
 अखेर ती मेली तेव्हा पोलीस पंचनाम्यात लिहिलं होतं... ‘जमीरा नावाची बेवारस स्त्री जीव आज रोजी दहन करण्याकामी ताबा मिळाल्याने कायद्याच्या अधीन राहून सोपस्कार करण्यात आल्याने ठाण्याची जमीरा एकू फाइल दफ्तरबंद करणेत येत आहे. मेहरबानास जाहीर व्हावे.'

◼◼

दुःखहरण/२७