पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनाथांचं आभाळ अनाथच!


 मी शोभा रामचंद्र सुतार. आता सौ. किरण नलवडे. माझे वडील लहानपणीच वारले. ते आठवत नाहीत. पाच वर्षांची झाले नसेन. वडिलांच्या मागे आईपण निघून गेली.
 अत्यंत लहानपणीच मला माझ्या मोठेपणाची जाणीव झाली. जबाबदारीने माझ्यात कधी पोक्तपणा आणला कळलेच नाही. ज्या वयात । खेळायचे, बागडायचे त्या वयात भावा- हिणींची मला लागलेली काळजी एक न उलगडणारे कोडे आहे खरे!
 आश्रमात प्रेमाचा ओलावा प्रचंड होता. इतर मुली संधी असून शिकायच्या नाहीत. त्यांना जबाबदारीही नव्हती. मी मात्र शिकत गेले. परिस्थितीच्या जाणिवेने नि भावंडांच्या पालकत्वामुळे शिकले. एसएससी होऊन आश्रमात नोकरीस लागले रेस्क्यू विभागात. नोकरी करत शिकत राहिले.

 दरम्यान, मुलींसाठी स्वतंत्रपणे अभिक्षणगृह सुरू करायचे ठरल्यानंतर संस्थेने मला जाणीवपूर्वक घेतले. संस्थेने माझ्या पालकत्वाची बजावलेली जबाबदारी कधीच विसरू शकणार नाही. मला कायमची नोकरी मिळाली. चार आकडी पगार. मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी छोटीशी खोली। घेऊन राहू लागले. माझ्या दोन भावा-बहिणींना मी आधार व्हायचे ठरविले नि तसा तो देता आला, याचा मला आज मोठा आनंद होतो. बहीण परिचारिका झाली. तिचं लग्न करून दिलं. ती कोकणात पडेलला सुखाचा

दुःखहरण/११४